ETV Bharat / state

काँग्रेसचे विसर्जन राहुल गांधीच करतील - योगी आदित्यनाथ - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

देशाला स्वातंत्र्य मिळताच काँग्रेस पक्षाचे विसर्जन करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. मात्र पंडित नेहरूंनी तो ऐकला नाही पण आता राहुल गांधीच हे काम करतील, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Oct 14, 2019, 11:19 AM IST

लातूर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. उदगीर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेला लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लातूरच्या उदगीर मतदारसंघात सभा

राहुल गांधींची उपस्थिती म्हणजे उमेदवाराचे डिपॉझिट जप्त

राहुल गांधी जिथे जातात तेथील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो सल्ला नेहरूंनी ऐकला नाही. त्यामुळे त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. कारण जिथे जिथे राहुल गांधी प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते, असा टोला आदित्यनाथ यांनी लगावला आहे. तसेच भाजप म्हणजे संविधान बदलू पाहणारा पक्ष असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षानेच सर्वात जास्त संविधानाचा अपमान केलाय, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

हेही वाचा... मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी

काश्मीरला 370 कलमाचा विशेष दर्जा देणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही मान्य नव्हते. तरीही काश्मीरला हा दर्जा काँग्रेसनेच दिला. संविधानाने आखून दिलेल्या गोर गरीब जनतेसाठीच्या योजना देशातील गाव पातळीवरील सामान्यापर्यंत पोहचवण्यात काँग्रेस कमी पडले. सर्व सामान्यांसाठी देशात कोणत्याही योजना राबवल्या नाहीत. मात्र, गेल्या 5 वर्षात काँग्रेसने 70 वर्षात जे केलं नाही, त्याच्या कितीतरी अधिक काम प्रधानमंत्री मोदी यांनी केले आहे, असे योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

हेही वाचा... 'राहुल गांधींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, तेवढ्या आमच्या जागा वाढतील'

Intro:काँग्रेस विसर्जनाचे राहुल गांधीच करतील : योगी आदित्यनाथ
लातूर : देशाला स्वतंत्र मिळताच काँग्रेस या पक्षाचे विसर्जन करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. मात्र, पंडित नेहरूंनी तो ऐकला नाही पण आता राहुल गांधीच हे काम करतील असा टोला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.
Body:विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिघेला पोहचला आहे. उदगीर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांना टार्गेट केले. भाजप म्हणजे संविधान बदलू पाहणारा पक्ष असा अपप्रचार करणाऱा काँग्रेस पक्षच सर्वात जास्त संविधानाचा अपमान करणारा पक्ष असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कर्नाटक राज्यातील बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते.
काश्मीरला 370 कलमाचा विशेष दर्जा देणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही मान्य नव्हते. तरीही काश्मीरला हा दर्जा काँग्रेसनेच दिला. संविधानाने आखून दिलेल्या गोर गरीब जनतेसाठीच्या योजना देशातील गाव पातळीवरील सामान्यापर्यंत पोहचविण्यात काँग्रेस कमी पडले. सर्व सामान्यांसाठी देशात कसल्याच योजना राबवल्या नाहीत. मात्र, गेल्या 5 वर्षात काँग्रेसने 70 वर्षात जे केलं नाही, ते कितीतरी पटीने जास्त करण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री मोदी यांनी केला आहे. काँग्रेसने 70 वर्षाच्या काळात केवळ संविधानाचा अपमान करण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीच केले नाही. जर काँग्रेसने काही केलंय तर ते देशांमध्ये सर्वात जास्त संविधानाचा अपमान करण्याचे काम केले आहे.Conclusion:राहुल गांधींची उपस्थिती म्हणजे उमेदवाराचे डिपॉझिट जप्त
राहुल गांधी जिथे जातात तेथील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते.
महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तो नेहरूनी ऐकला नाही. त्यामुळे त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. कारण जिथे राहुल गांधी प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.