ETV Bharat / state

जे पोलिसांना जमले नाही ते केले महिलांनी, गावातील दारुचे अड्डे केले उध्वस्त, - illegal alcohol selling

बोरसुरी येथील ४ घरांमध्ये अवैधपणे दारूची विक्री केली जात होती. याबाबत औराद शा. पोलिसांकडे तक्रारी करुनही कानाडोळा केला जात होता. त्यामुळे या ४ अड्ड्यांवर हल्ला करत महिलांनी एल्गार पुकारत सलग २ दिवस अवैध दारू विक्री करणारे चारही अड्डे उध्वस्त केले. मात्र, या महिलांवर औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

latur
औराद शा. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली फिर्याद
author img

By

Published : Dec 31, 2019, 7:29 PM IST

लातूर - निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील अवैध दारुविक्री करणाऱ्या ४ अड्ड्यांवर महिलांनी हल्ला चढवला. महिलांनी एल्गार पुकारत सलग २ दिवस अवैध दारु विक्री करणारे चारही अड्डे उध्वस्त केले. औराद शा पोलीस कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या गावातील महिला, पुरुष, युवकांनी कायदा हातात घेऊन घरातील साहित्य, दारुच्या बाटल्यांची तोडफोड केली. तसेच पत्र्यांचे शेड संपूर्णपणे मोडून टाकत सर्व आड्डे उध्वस्त केले. जे आजपर्यंत पोलिसांना जमले नाही ते गावातील या रनरागिनी महिलांनी करून दाखवले. परंतू, याच ३५ रणरागिनींंवर औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र सर्वसामान्य माणसात संतापाची लाट पसरली आहे.

latur
औराद शा. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली फिर्याद

निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील ४ घरांमध्ये अवैधपणे दारूची विक्री केली जात होती. याबाबत औराद शा. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे गावातील महिला, पुरुष, युवकांनी एकत्र येऊन अवैध दारु विक्रेत्याविरुध्द कायदा हातात घेऊन तोडफोड केली. दारुच्या बाटल्या फोडून टाकल्या. याचा राग मनात धरून या प्रकरणी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीसांनी दिनांक २९ रोजी अवैध दारूविक्री करणाऱ्यांच्या फिर्यादीवरुन सुमारे ३० ते ४५ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या अवैध दारु विक्रेत्याविरुध्दच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, पुरुष, युवकांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिलांनी उद्ध्वस्त केली अवैध दारूविक्री अड्डे

हेही वाचा - लातुरात पंचायत समितीमध्ये भाजपचीच सरशी

अवैध दारूविक्री करून गाव नासवणाऱ्या लोकांना पाठीशी घालत त्यांच्या तक्रारीवरून बोरसुरी येथील ३५ महिलांवर गुन्हे दाखल झालेत. परंतु, त्यांना अटक करण्यात येणार का, याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - दोन मंत्रीपदाने काँग्रेसला मिळाले लातुरात गतवैभव; भाजपची पिछेहाट

Intro: त्या ३५ रनरागीनीवर गुन्हे दाखल औराद शा पोलिसांच्या उलट्या बोंबा चोर सोडून सन्याशीला फाशी...Body:त्या ३५ महिलावर गुन्हा दाखल
औराद शा.पोलिसांच्या उलट्या बोंबा चोर सोडून सन्याशाला......

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा तालूक्यातील बोरसुरी येथील अवैध दारुविक्रि करणाऱ्या चार आड्यावर हल्ला करत महिलांनी एल्गार पुकारला व सलग दोन दिवस अवैध दारू विक्री करणारे चारही अड्डे उध्वस्त केले औराद शा पोलिस कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या गावातील महिला, पुरुष, युवकांनी कायदा हातात घेऊन घरातील साहित्य , दारुच्या बाटल्यांची तोडफोड केली. तसेच पञूयाचे शेड संपूर्ण पणे मोडून टाकले आणि सर्व आड्डे उध्वस्त केले.जे आज पर्यंत पोलिसांना जमल नाही ते गावातील या रनरागीनी महिलांनी करून दाखवले परंतू याच ३५ रनरागीनीवर औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र सर्वसामान्य माणसात संतापाची लाट पसरली आहे.

निलंगा तालूक्यातील बोरसुरी येथे चार घरामध्ये अवैध पणे दारुची विक्री केली जात होती. औराद शा.पोलीसांकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नव्हती त्यामुळे गावातील महिला, पुरुष, युवकांनी एकत्र येऊन अवैध दारूविक्रेत्याविरुध्द कायदा हातात घेऊन तोडफोड केली. दारुच्या बाटल्या फोडून टाकल्या होत्या. याचा राग मनात धरून या प्रकरणी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीसांनी दिनांक २९ रोजी अवैध दारुविक्री करणाऱ्यांच्या फिर्यादीवरुन सुमारे 30 ते 35 जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या अवैध दारु विक्रेत्याविरुध्दच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, पुरुष, युवकांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Conclusion:अवैध दारू विक्री करून गाव नासवणा-या लोकांना पाठीशी घालत त्यांच्या तक्रारीवरून बोरसुरी येथिल ३५ महिलावर गुन्हे दाखल झाले खरे पण त्यांना अटक करणार का याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.