ETV Bharat / state

ETV Bharat Impact : किल्लारीच्या वस्तु संग्रहालयाला पुर्नवैभव देणार; भूकंप पुनर्वसन राज्यमंत्र्यांची ग्वाही - किल्लारी भूकंप वस्तु संग्रहालयाची दुरवस्था

राज्य शासनाच्या भूकंप पुनर्वसन प्रकल्पांतर्गत जुने किल्लारी परिसरात 'स्मृती संग्रहालय' उभारण्यात आले. मात्र आज त्याची अवस्था अत्यंत विदारक आहे. ईटीव्ही भारतच्या वृत्तानंतर भुकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दखल घेतली असून या वस्तू संग्रहालयाला पुन्हा सुस्थितीत आणून पुन्हा जनतेच्या सेवेत सुरु करणार असून भुकंपात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या स्मृतींची विटंबना होणार नाही, याची काळजी शासन-प्रशासन घेईल अशी ग्वाही दिली.

-killari-museum
-killari-museum
author img

By

Published : Oct 6, 2021, 9:23 PM IST

लातूर - 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे महाप्रलयंकारी भूकंप झाला. भूकंपग्रस्त 52 गावातील अवशेष व स्मृतींचे जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या भूकंप पुनर्वसन प्रकल्पांतर्गत जुने किल्लारी परिसरात 'स्मृती संग्रहालय' उभारण्यात आले. मात्र आज त्याची अवस्था अत्यंत विदारक आहे. यावर्षी या घटनेला 28 वर्षे पूर्ण होत असल्याने 'ईटिव्ही भारत'ने यावर विशेष रिपोर्ट सादर केला. याची दखल भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 'भूकंप पुनर्वसन प्रकल्प' अंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालूक्यातील किल्लारी व परिसरातील 52 गावे भुकंपग्रस्त आहेत. या भूकंपग्रस्त गावातील अवशेष व स्मृतींचे जतन करण्यासाठी जुने किल्लारी येथे सन 1999 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुकंप पुनर्वसन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यावेळी तब्बल 35 लाख खर्च करुन एक 'स्मृती संग्रहालय' अतिशय दिमाखात उभारण्यात आले. त्यानंतर काही वर्षे ते सुस्थितीत होते. परंतु नंतरच्या काळात त्याची मोठी पडझड झाली असून सध्या या वस्तू संग्रहालयाचा उपयोग गुरे बांधण्यासाठी केला जातोय.

भुकंप पुनर्वसन राज्यमंत्र्यांची ग्वाही

यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने 30 सप्टेंबर 2021 रोजी यावर सविस्तर विशेष बातमी दाखवली होती. याची दखल घेत राज्याच्या भूकंप पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सदरील 'वस्तु संग्रहालय' सुस्थितीत आणण्यासाठी शासन व प्रशासनाच्या पातळीवर सर्व अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेवून या वस्तू संग्रहालयाला पुन्हा सुस्थितीत आणून पुन्हा जनतेच्या सेवेत सुरु करणार असून भुकंपात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या स्मृतींची विटंबना होणार नाही, याची काळजी शासन-प्रशासन घेईल असे 'ई-टीव्ही भारत' शी बोलताना सांगितले आहे.

वास्तूची किंमत 58.41 लाख रुपये -

महाराष्ट्र शासनाच्या 'आपत्कालीन भूकंप पुनर्वसन प्रकल्प' अंतर्गत किल्लारी येथे 'स्मृती स्तंभ व वस्तू संग्रहालय' या इमारतीचे उद्घाटन 1999मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत दिमाखात करण्यात आले. या प्रकल्पाने एकूण 2.50 एकर क्षेत्र व्यापले आहे. या कामाची एकूण किंमत 58.41 लक्ष रुपये असून वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी शासनाने त्यावेळी 35 लक्ष रुपये खर्च केले आहेत. या प्रकल्पाची सुरुवात फेब्रूवारी 1998मध्ये करण्यात आली होती. मे 1999मध्ये हा प्रकल्प दिमाखात उभा राहिला. उद्घाटनानंतर जवळपास 3-4 वर्ष हे संग्रहालय सुस्थितीत होते. मात्र, त्यानंतर याची पडझड व्हायला सुरुवात झाली. आज 22 वर्षानंतर या संग्रहालयाची अत्यंत वाईट स्थिती असून गुरे बांधण्यासाठी याचा वापर केला जात आहे.

हे ही वाचा - Killari Earthquake : भूकंपातील अवशेषांचे जतन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या 'वस्तु संग्रहालयाची' अवस्था बिकट

मंत्र्यांनी लक्ष घालून वास्तूची जपणूक करण्याची नागरिकांची मागणी -

'वस्तु संग्रहालय' म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण असून शासकीय, सार्वजनिक व ऐतिहासिक माहिती मिळविण्याचे स्त्रोत असते. ज्यामध्ये वस्तुसंशोधक, अभ्यासक यांना अतिशय मौल्यवान, दुर्मिळ वस्तूंचे जतन करुन विनाश, विध्वंस होण्यापासून संरक्षण करता येते. दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी या रोजी भूकंपामध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते. परंतु त्यांच्याच आठवणींचे अवशेष जतन करण्यासाठी उभा करण्यात आलेल्या वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीकडे मात्र प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेंद्र पाटील यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली होती. तसेच राज्याचे भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे हे लातूरचे आहेत. शिवाय राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लक्ष देऊन या वास्तूची जपवणूक करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ मोहनसिंग राजपूत यांनी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.