ETV Bharat / state

चुकारवाडी ग्रामस्थांचा रस्त्यावर बैलगाडी उतरवून 'रास्तारोको' - road

रेणापूर तालुक्यातील चुकारवाडी-पाथरवाडी या दीड किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या 5 वर्षांपासून रखडले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी रास्तारोको केला.

रास्तारोको
author img

By

Published : Jul 17, 2019, 12:05 PM IST

लातूर - रेणापूर तालुक्यातील चुकारवाडी-पाथरवाडी या दीड किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलेले आहे. पावसाळ्यात तर या मार्गावरून पायी चालणेही अवघड होते. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही लोकप्रतिनीधींचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी सोमवारी लातूर-अहमदपूर या राज्यमार्गावरील पाथरवाडी येथे वाहने आणि बैलगाड्या घेऊन रास्तारोको केला.

ग्रामस्थांचा रस्त्यासाठी 'रास्तारोको'

चुकारवाडी ते पाथरवाडी या रस्त्याचे काम झाल्यास हे गाव दळवळणाच्या प्रवाहात येणार आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आमदार त्रिंबक भिसे यांनीही दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी लोकप्रनिधीसह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात तर चुकारवाडी ग्रामस्थांचा संपर्कच तुटतो. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. ग्रामसडक योजनेचे अभियंता गुरमे यांनी नोव्हेंबर महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Intro:चुकारवाडी ग्रामस्थांचा रस्त्यासाठी 'रास्तारोको'
लातुर : रेणापूर तालुक्यातील चुकारवाडी - पाथरवाडी या दीड किमी रस्त्याचे काम गेल्या 5 वर्षापासून रखडलेले आहे. पावसाळ्यात तर या मार्गावरून पायी मार्गस्थ होणेही मुश्किल होते. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही लोकप्रनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी सोमवारी लातूर-अहमदपूर या राज्यमार्गावरील पाथरवाडी येथे रास्तारोको केला.
Body:चुकारवाडी ते पाथरवाडी या रस्याचे काम झाल्यास हे गाव दळवळणाच्या प्रवाहात येणार आहे. मात्र, दीड किमी असलेल्या या दुरुस्तीकडे आ. त्रिंबक भिसे यांनीही दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी लोकप्रनिधीसह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. पावसाळ्यात तर चुकारवाडी ग्रामस्थांचा संपर्कच तुटतो. त्यामुळे या रास्ताचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज ग्रामस्थ वाहने आणि बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. सकाळी 11 ते 1 च्या दरम्यान रास्तारोको केल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रामस्थांनी जिल्हा। परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही दिले होते. परंतु याची दखल न घेतल्याने ग्रामस्थानी आंदोलन केले होते. यावेळी श्रीधर विठ्ठल बडे, शिवाजी बडे, विनायक बडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Conclusion:ग्रामसडक योजनेचे अभियंता गुरमे यांनी नोव्हेंबर महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.