लातूर : दिवसेंदिवस उदगीर शहरातील कोरोबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. दोन दिवसांपूर्वी 15 रुग्णांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला होता तर शुक्रवारी 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे. डिस्चार्जप्रसंगी या सहा जणांवर फुलांचा वर्षाव टाळ्यांचा कडकडाट करत यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
गेल्या 20 दिवसांमध्ये उदगीर शहरातील रुग्णांची संख्या ही 29 वर गेली होती. तर यामध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरून गेले होते. मात्र, संचारबंदी आणि शहराच्या सीमा सील करून कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. गेल्या 5 दिवसांपासून संशयित रुग्णांची संख्या घटत आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. आज 6 रुग्णांना डिस्चार्ज देताना राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच सामान्य रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या रुग्णांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता.
रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही तर 19 मे पर्यंत उदगीर शहर पर्यायाने लातूर जिल्हा हा कोरोनामुक्त होणार आहे हे नक्की.