ETV Bharat / state

उदगीरच्या दुग्धभुकटी प्रकल्पाला घरघर, प्रकल्प जूनपासून बंद - Latur District Latest News

केवळ उदगीर तालुकाच नव्हे तर औसा, देवणी, जळकोटसह अहमदपूर तालुक्यातील दुध उत्पादकांसाठी उदगीर येथील दुग्धभुकटी प्रकल्प हा वरदान ठरला आहे. मात्र, दिवसेंदिवस दुधाचे घटते उत्पादन आणि गडगडलेले दर यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तर परवड सुरूच आहे, पण येथील उलाढालही ठप्प आहे.

Udgir dairy project closed
उदगीरच्या दुग्धभुकटी प्रकल्पाला घरघर
author img

By

Published : Dec 29, 2020, 8:58 PM IST

लातूर - केवळ उदगीर तालुकाच नव्हे तर औसा, देवणी, जळकोटसह अहमदपूर तालुक्यातील दुध उत्पादकांसाठी उदगीर येथील दुग्धभुकटी प्रकल्प हा वरदान ठरला आहे. मात्र, दिवसेंदिवस दुधाचे घटते उत्पादन आणि गडगडलेले दर यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तर परवड सुरूच आहे, पण येथील उलाढालही ठप्प आहे.

26 जूनपासून प्रकल्प बंद

शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. बेभरवशाची शेती असल्याने शेतकरी दुग्धव्यवसायावर भर देत आहेत. त्यामुळेच 1979 साली उदगीर येथे या दुग्धभुकटी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. पण या शासकीय प्रकल्पावर दुधाची आवक दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू देखील करता येत नाही अशी अवस्था झाली आहे. उदगीर ही लातूर जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे. अहमदपूर, जळकोट, देवणी, शिरूर अंतनपाळ या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा शासकीय दुग्धभुकटी प्रकल्प उभारण्यात आला होता. सुरूवातीच्या काळात 8 ते 10 हजार लिटर दुधाची आवक होत असल्याने, सर्व काही सुरळीत होते. मात्र दुधाचा दर वाढवला जात नसल्याने हळूहळू आवक घटली. हा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी दिवसाला किमान 6 हजार लिटर दुधाची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 2 हजार 300 लीटर दुधाची आवक होत असल्याने अखेर 26 जूनपासून हा प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उदगीरच्या वैभवात भर टाकणाऱ्या या प्रकल्पाला घरघर लागली आहे.

उदगीरच्या दुग्धभुकटी प्रकल्पाला घरघर

लोकप्रतिनिधीची अनास्था

केवळ उदगीर तालुकाच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांना या दुग्धभुकटी प्रकल्पाचा फायदा झाला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद असल्याने शेतकऱ्यांची तर गैरसोय होत आहेच, पण तालुक्याच्या विकासाला ब्रेक लागला आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले आहे. पण आवश्यक असलेले दुध उत्पादन वाढविण्यासाठी कोणतेही पर्याय अवलंबले जात नाही हेच वास्तव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.