ETV Bharat / state

'माझं काय चुकलं'... उदगीरचे भाजप आमदार बंडाच्या पवित्र्यात - उद्गीर मतदारसंघ

लातूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरीचे लोण पसरले आहे. तेथील मोठ्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी रविवारी शहरात शक्तीप्रदर्शन केले.

सुधाकर भालेराव, (भाजप आमदार, उदगीर मतदारसंघ)
author img

By

Published : Oct 6, 2019, 11:31 PM IST

लातूर - जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरीचे लोण पसरले आहे. या सर्वांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी तर रविवारी 'माझं काय चुकलं' अशा नावाची पाटी हातात घेऊन रॅली काढली. त्यामुळे त्यांनी निवडणूक तर लढवणारच असा इशारा दिला आहे. सोमवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत असून या मतदारसंघात काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठे पक्षांतर झाले नसले तरी बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजपमधील नाराजांची संख्या अधिक असून उदगीर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांना तिकीट डावलून परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज आमदार सुधाकर भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. उद्या अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून आता कार्यकर्ते म्हणतील तो अंतिम निर्णय असल्याचे त्यांनी पदयात्रेदरम्यान स्पष्ट केले.

'माझं काय चुकलं'... उदगीरचे भाजप आमदार बंडाच्या पवित्र्यात

स्थानिक कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणारे यांनी अपल्याबाबत अपप्रचार करून माझा पत्ता कट केला आहे, असे म्हणत त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बंडखोरी वाढली असून याचा भाजपला फटका बसणार असल्याची चर्चा आहे. रविवारी आमदार सुधाकर भालेराव यांनी मोठी पदयात्रा करत शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे पदयात्रेतील जनसमुदाय आणि आमदारांची नाराजी पक्ष कशी दूर करणार हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा -औरंगाबादमध्ये काँग्रेसला झटका; पश्चिम मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाडांचा अर्ज बाद

Intro:बाईट : सुधाकर भालेराव, उदगीर आमदार

उदगीर आमदारच्या हातामध्ये 'माझं काय चुकलं' ची पाटी
लातूर : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात भाजपात बंडखोरीचे लोण पसरले आहे. या सर्वांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी तर रविवारी माझं काय चुकलं ही पाटी हातात घेऊन रॅली काढली. त्यामुळे त्यांनी निवडणूक तर लढविणारच असा इशारा दिला आहे. सोमवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत असून या मतदारसंघात काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Body:जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठे पक्षांतर झाले नसले तरी बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजपामधील नाराजांची संख्या अधिक असून उदगीर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांना तिकीट डावलून परभणीचे डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज आमदार सुधाकर भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. उद्या अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून आता कार्यकर्ते म्हणतील तो अंतिम निर्णय असल्याचे त्यानी पदयात्रा दरम्यान स्पष्ट केले आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणारे यांनी अपल्याबाबत अपप्रचार करून माझा पत्ता कट केला. असे म्हणत त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बंडखोरी वाढली असून याचा भाजपाला फटका बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज आमदार सुधाकर भालेराव यांनी मोठी पदयात्रा करीत शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे पडयात्रेतील जनसमुदाय आणि आमदारांची नाराजी पक्ष कशी दूर करणार हे पाहावे लागणार आहे.

Conclusion:गेल्या 10 वर्षांपासून जनतेची सेवा करीत असताना मी चुकलो कुठे असा प्रश्न त्यांनी या पदयात्रा दरम्यान केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.