ETV Bharat / state

'कर्जमाफीस पात्र म्हणून सत्कार झाला, पण कर्जमाफी झालीच नाही'

author img

By

Published : Nov 5, 2019, 7:14 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत असतानाच आम्हाला दुसरा पर्यायच नसल्याचे शेतकरी सांगत होते.

शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे

लातूर - युती सरकारच्या काळात म्हणजे 2017 साली कर्जमाफीचे लाभार्थी म्हणून सदाशिव रामपुरे यांची निवड झाली. एवढेच नाही तर पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते सत्कारही झाला. मात्र, आजही हा शेतकरी कर्जाचा डोंगर माथ्यावर घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बांधावर आले असता त्यांनी ही कर्जमाफीची अजब कथा त्यांच्या कानावर घातली.

शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे

गेल्या 5 वर्षांच्या युती काळात केवळ घोषणांचा पाऊस झाला. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. नैसर्गिक संकट आणि प्रशासनाचा कारभार यामुळेच आत्महत्या करण्याची नामुष्की आमच्यावर ओढवत असल्याचे शेतकरी सांगत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत असतानाच आम्हाला दुसरा पर्यायच नसल्याचे शेतकरी सांगत होते. अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव शिवारातील पिकांची पाहणी करीत असताना शेती व्यवसायातील अडचणींचा पाढा शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडला. तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना केंद्र स्थापन करणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. शिवाय पंचनामे, कागदपत्रांची अट न घालता त्वरित मदत करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित तहसीलदार यांना दिले.

सरकार स्थापन होताच जाहिरनाम्यातील अश्वसनांची पूर्तता

आता सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गोष्टी त्यांच्या पदरात पडणार आहेत. तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच हे सर्व करीत असून धीर धरा, कुटुंबाचा आधार बना, आत्महत्येसारखा विचार मनात आणू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले.

Intro:कर्जमाफीस पात्र म्हणून सत्कार मात्र, प्रत्यक्षात कर्जाचा डोंगर कायम; शेतकऱ्याने पक्षाप्रमुखांसमोर मांडली व्यथा
लातूर : युती सरकारच्या काळात म्हणजे 2017 साली कर्जमाफीचे लाभार्थी म्हणून सदाशिव रामपुरे यांची निवड झाली...एवढेच नाही तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कारही झाला मात्र, आजही हे शेतकरी कर्जाचा डोंगर माथ्यावर घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. आज परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बांधावर आले असता त्यांनी ही कर्जमाफीची अजब कथा त्यांच्या कानावर घातली.

Body:गेल्या 5 वर्षाच्या युती काळात केवळ घोषणांचा पाऊस झाला मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. नैसर्गिक संकट आणि प्रशासनाचा कारभार यामुळेच आत्महत्या करण्याची नामुष्की आमच्यावर ओढवत असल्याचे शेतकरी सांगत होते. आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आत्महत्या करू नका शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असे सांगत असतानाच आम्हाला दुसरा पर्यायच नसल्याचे शेतकरी सांगत होते. अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव शिवारातील पिकांची पाहणी करीत असताना शेती व्यवसायातील अडचणींचा पाढा शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडला. तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना केंद्र स्थापित करणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. शिवाय पंचनामे, कागदपत्रांची अट ना घालता त्वरित मदत करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित तहसीलदार यांना दिले.

Conclusion:सरकार स्थापन होताच जाहिरनाम्यातील अश्वसनांची पूर्तता
आता सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गोष्टी त्यांच्या पदरात पडणार आहेत. तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच हे सर्व करीत असून धीर धरा कुटुंबाचा आधार बना आत्महत्येसारखा विचार मनात आणू नका असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.