ETV Bharat / state

प्रलंबित अहवाल असणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज.. गावभर फिरल्यानंतर रिपोर्ट पाॅझिटिव्ह

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ममदापूर येथील 11 जणांना आरोग्य विभागाने तपासणीसाठी विलगिकरण कक्षात दाखल केले होते. मात्र, यापैकी 9 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर दोघांचे अहवाल हे प्रलंबित होते. प्रलंबित अहवाल दुसऱ्या दिवशी येतात.

two-pending-patient-reports-are-positive-in-latur
कोरोना
author img

By

Published : Jul 11, 2020, 7:20 PM IST

लातूर- सध्या कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाचे वेगवेगळे पराक्रम समोर येत आहेत. लातुरात घडलेला प्रकार अधोरेखित करण्यासारखा आहे. लातुरात अहवाल प्रलंबित असलेल्या व्यक्तींना घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर त्या व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आढळ्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंंधित व्यक्ती घरी जाऊन अनेक जणांच्या संपर्कात आल्या असून आता त्या सर्व जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

प्रलंबित अहवाल असणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज..

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ममदापूर येथील 11 जणांना आरोग्य विभागाने तपासणीसाठी विलगिकरण कक्षात दाखल केले होते. मात्र, यापैकी 9 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर दोघांचे अहवाल हे प्रलंबित होते. प्रलंबित अहवाल दुसऱ्या दिवशी येतात. मात्र, याला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचा प्रकार लातुरातील 12 नंबर पाटी येथील विलगिकरण कक्षात घडला आहे. या दोन रुग्णांनाही निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींबरोबर घरी सोडण्यात आले. परिणामी या दोन व्यक्तींच्या संपर्कात गावातील अनेकजण आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे काम वाढले असून या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आता कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच प्रलंबित अहवाल म्हणजे काय, यामध्ये काही अडचणी आल्यास हे अहवाल प्रलंबित ठेवले जातात याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबतची पुष्टी तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक सारडा यांनी दिली आहे.

हेही वाचा- यंदा राजधानीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्यात बदल; कोरोना योद्धे वाढवणार कार्यक्रमाची शोभा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.