ETV Bharat / state

वादग्रस्त वक्तव्यांवरून २ समाजात वाद; शनिवारी लातूर जिल्हाबंदचे आवाहन

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एका समाजातील तरुणाने दुसऱ्या समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली.

पोलीस बंदोबस्त
author img

By

Published : Apr 19, 2019, 10:26 PM IST

लातूर - येथे एका कार्यक्रमादरम्यान, एका समाजातील तरुणाने दुसऱ्या समाजाबद्दल वादग्रस्त विधाने केल्याने शुक्रवारी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वादग्रस्त विधानांचा निषेध करीत दुसऱ्या समाजाच्यावतीने शनिवारी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित तरुणावर आचारसंहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एका समाजातील तरुणाने दुसऱ्या समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली. तर, शुक्रवारी शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिवाय शहरातून निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान एक तरुण चित्रफीत काढत असल्याचे मोर्चेकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. यावरून त्या तरुणाचा समर्थक असल्याच्या संशयावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद आता जिल्हाभर पसरत असून उद्या जिल्हा बंदचे आवाहन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासंदर्भात आज लातूर येथे बैठकही पार पडली आहे.

Intro:अहमदपूरात तणावपूर्ण शांतता ; मराठा समाजाबाद्दलच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद
लातूर - अहमदपूर येथे कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने मराठा समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्याचे पडसाद शुक्रवारी पाहवयास मिळाले. वादग्रस्त विधानाचा निषेध करीत मराठा सकल समाजाच्यावतीने बंदचे अवाहन करण्यात आले. त्यामुळे शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती तर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सदरील तरुणावर अचारसंहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सय्यद साजीद याने मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यानंतर सोशल मिडीयावर त्याच्यावर टिकेची झोड उडाली तर शुक्रवारी शहर बंद ठेवण्याचे अवाहन करण्यात आले होत. शिवाय शहरातून निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान एक तरुण चित्रफीत काढत असल्याचे मोर्चेकरांच्या निदर्शनास आले होते. यावरून तो सय्यद साजीद याचाच समर्थक असल्याच्या संशयावरून काही काळ तणाव निर्र्माण झाला होता. त्यामुळे पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वादग्रस्त विधानामुळे सय्यद साजीद याच्यावर अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Conclusion:या घटनेचे पडसाद आता जिल्हाभर पसरत असून उद्या जिल्हा बंदचे अवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासंदर्भात आज लातूर येथे बैठकही पार पडली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.