ETV Bharat / state

लातूरमध्ये अडीच हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

सचिन भगवान बोटुळे, असे या तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

अडीच हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
author img

By

Published : May 17, 2019, 11:10 PM IST

लातूर - खरेदी केलेल्या जमिनीचे फेर ओढण्यासाठी अडीच हजाराची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सचिन भगवान बोटुळे, असे या तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे तो कार्यरत होता.

अडीच हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील फिर्यादीच्या आईच्या नावाने खरेदी केलेल्या गट नंबर 159 मधील जमिनीचे फेर करण्यासाठी बक्षीस म्हणून दोन हजार पाचशे रुपयांची लाच मागितली होती. शहरातील शिवाजी चौक येथे 2 हजार 500 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले.

लाचेच्या रक्कमेसह तलाठी सचिन भगवान बोटुळे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक वर्षा दंडीमे पुढील तपास करत आहेत.

Intro:अडीच हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
लातुर : खरेदी केलेल्या जमिनीचे फेर ओढण्यासाठी अडीच हजाराची लाच घेणारा तलाठी एसीबी च्या जाळ्यात अडकला. निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील लाच स्वीकारताना सचिन भगवान बोटुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
Body:निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा फिर्यादीच्या आईच्या नावाने खरेदी केलेल्या गट नंबर 159 मधील जमिनीचे फेर करण्यासाठी बक्षीस म्हणून दोन हजार पाचशे रुपयांची लाच मागितली होती. शहरातील शिवाजी चौक येथे 2500 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचेच्या रकमेसह तलाठी सचिन भगवान बोटुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. Conclusion:प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक माणिक बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक वर्षा दंडीमे पुढील तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.