लातूर : मुळची औरंगाबाद येथील रहिवासी असलेली साक्षी गायकवाड (वय 19 वर्षे) लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. उद्यापासून (18 जानेवारी,2023) तिची एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. परंतु, आजच तीने आपले जीवन संपवले आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील मुलींच्या वस्तीगृहात तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आत्महत्येचा निर्णय का घेतला ? डॉक्टर साक्षी ही अभ्यासात हुशार होती. तिच्या संदर्भात जवळच्या मैत्रिणीनी कोणतेही संभ्रमात्मक बाब अद्यापही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली नाही. याप्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य कोल्हे पुढील तपास करित आहेत. आत्महत्येचा निर्णय घेतला त्या अगोदर साक्षीचे कुणाशी काही बोलणे झाले होते का याचीही चौकशी केली जात आहे.
दोषींवर कारवाई केली जाईल : डॉ. साक्षी गायकवाडने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, उद्यापासून सुरू होत असलेली एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची परीक्षा आणि आज केलेली आत्महत्या याचा काही संबंध आहे का ? त्याची सखोल चौकशी होणार आहे असही पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, यातील दोषींवर कारवाई केली जाईल असही ते म्हणाले आहेत.
मोठी कारवाई करण्यात येणार : लातुरमध्ये आता अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच, यासाठी रचनात्मक बदल घडवून आणणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे. तसेच, या घटनेत कुणी दोषी आढळले तर मोठी कारवाई करण्यात येणार आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा : हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आयआयएमच्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला.. हातपाय होते बांधलेले