ETV Bharat / state

काळाच्या ओघात शिक्षणाचे बाजारीकरण, लातूर पॅटर्नला संस्थाचालकांचाच धोका - विद्यार्थी पालक मंच

author img

By

Published : May 2, 2019, 3:20 PM IST

शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नची ओळख राज्यातच नाही तर देशात झाली आहे. मात्र, काळाच्या ओघात शिक्षणाचे बाजारीकरण होत असून, शहरातील शाळा, संस्था प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करोडो रुपयांची लूट करीत आहेत. शाळा प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राबवावी यासाठी विद्यार्थी पालक मंचच्या वतीने शिक्षण उपसंचालक एस.एम. यादगिरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

विद्यार्थी पालक मंचच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना निवेदन

लातूर - शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नची ओळख राज्यातच नाही तर देशात झाली आहे. मात्र, काळाच्या ओघात शिक्षणाचे बाजारीकरण होत असून, शहरातील शाळा, संस्था प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करोडो रुपयांची लूट करीत आहेत. संस्थाचालकांच्या आर्थिक लुटीमुळे सर्वसामान्य पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शाळा प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राबवावी यासाठी विद्यार्थी पालक मंचच्या वतीने शिक्षण उपसंचालक एस.एम. यादगिरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

शिक्षणाच्या नावाखाली शहरात इंग्रजी शाळा, सीबीएससी शाळा, सेमी इंग्लिश स्कूल शाळांचे पेव फुटले आहे. या शाळा अधिकृत आहेत की अनाधिकृत याचीही कल्पना पालकवर्गास नाही. शहरातील अनेक नामांकित शाळा, संस्था डोनेशन घेऊन परस्पर उन्हाळी सुट्ट्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतात. तर शालेय परीक्षांचे निकाल लागण्यापूर्वीच काही शाळा प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

या सर्व भोंगळ व अनागोंदी कारभारावर शासकीय यंत्रणेचा कसलाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे नर्सरी, एलकेजी, यूकेजी प्रवेशासाठीच्या शुल्कावर प्रशासनाच्या वतीने विद्यार्थी व पालकांना झेपेल अशा स्वरूपाचे शुल्क निर्धारण करावे. प्राथमिक व माध्यमिक शाळातील प्रत्येक वर्गाच्या रिक्त जागांची माहिती पालकांना द्यावी. उन्हाळी सुट्टीत प्रवेश प्रक्रिया केली जाऊ नये. शाळांच्या प्रवेशद्वारासमोर शाळेत डोनेशन घेतले जात नाही, अशा आशयाचा फलक कायमस्वरूपी लावण्यासाठी सर्व शाळांना आदेशित करावे, अशा मागण्यांचे निवेदन उपसंचालक एस.एम. यादगिरे देण्यात आले आहे. यावर प्रशासनाने उपाययोजना न केल्यास विद्यार्थी-पालक मंचच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यावेळी अॅड. उदय गवारे, अॅड. प्रदीपसिंह गंगणे, अन्तेश्वर कूदरपाके, ताहेरभाई सौदागर, विनोदकुमार धूमाल यांच्यासह मोठ्या संख्यने पालकांची उपस्थिती होती.

Intro:लातूर पॅटर्नला मुख्याध्यापक, संस्थाचालकांचाच धोका : विद्यार्थी पालक मंच
लातूर : शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नची ओळख राज्यातच नाही तर देशात झाली आहे. मात्र, काळाच्या ओघात शिक्षणाचे बाजारीकरण होत असून शहरातील शाळा संस्था प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करोडो रुपयांची लूट करीत आहेत. संस्थाचालकांच्या आर्थिक लुटीमुळे सर्वसामान्य पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. नियमित शाळा प्रवेश व त्यामध्ये पारदर्शकता राबवावी याकरिता विद्यार्थी पालक मंचच्या वतीने शिक्षण उपसंचालक एस.एम यादगिरे यांना निवेदन देण्यात आले. Body:शिक्षणाच्या नावाखाली शहरात इंग्रजी शाळा, सीबीएससी शाळा, सेमी इंग्लिश स्कूलशाळांचे पेव फुटले आहे. या शाळा अधिकृत आहेत की अनाधिकृत याचीही कल्पना पालक वर्गास नाही. शहरातील अनेक नामांकित शाळा संस्था डोनेशन घेऊन परस्पर उन्हाळी सुट्ट्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतात तरशालेय परीक्षांचे निकाल लागण्यापूर्वीच काही शाळा प्रक्रिया पूर्ण करत आहेत. या सर्व भोंगळ व अनागोंदी कारभारावर शासकीय यंत्रणेचा कसलाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे नर्सरी एलकेजी यूकेजी प्रवेशासाठीच्या शुल्कावर प्रशासनाच्या वतीने विद्यार्थी व पालकांना झेपेल अशा स्वरूपाचे शुल्क निर्धारण करावे, प्राथमिक व माध्यमिक शाळातील प्रत्येक वर्गाच्या रिक्त जागांची माहिती पालकांना द्यावी, उन्हाळी सुट्टीत प्रवेश प्रक्रिया केली जाऊ नये, शाळांच्या प्रवेशद्वारासमोर शाळेत डोनेशन घेतले जात नाही अशा आशयाचा फलक कायमस्वरूपी लावण्यासाठी सर्व शाळांना आदेशित करावे,अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावर प्रशासनाने उपाययोजना न केल्यास विरुद्ध विद्यार्थी-पालक मंच च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. Conclusion:यावेळी ऍड. उदय गवारे, अड प्रदीपसिंह गंगणे, अन्तेश्वर कूदरपाके, ताहेरभाई सौदागर, विनोदकुमार धूमाल, सागर सूर्यवंशी, यशपाल काबले यांच्यासह पालकांची मोठी उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.