ETV Bharat / state

शेतकरी युवा संघटनेचे औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन - शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन औसा

सरसकट कर्जमुक्ती करावी, वीजेचे बिल माफ करावे, बाजारातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरुपी बाजूला करून बाजारसमित्या नियममुक्त कराव्यात, शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, यासारख्या मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले आहे.

ausa
शेतकरी युवा संघटनेचे औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
author img

By

Published : Dec 12, 2019, 9:03 PM IST

लातूर - उत्पादनापेक्षा लागवड खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे कर्जाचा भार वाढत असून राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेती व्यवसायावरील बंधने हटवून बाजार आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे, या मुख्य मागणीसाठी शेतकरी युवा संघटनेच्यावतीने गुरुवारी औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी युवा संघटनेचे औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

निसर्गाचा लहरीपणा आणि प्रशासकीय धोरणे यामध्येच शेतकरी अडकला आहे. या परस्थितीला शेतीविषयक धोरणे आणि कायदे कारणीभूत असल्याचे संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी म्हटले होते. बाजारसमिती कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा, कमाल जमीन धारण कायदा यामुळे शेतकरी जेरीस आला आहे. त्यामुळेच आत्महत्या वाढत असल्याचा आरोप शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपेश लंके यांनी केला आहे.

हेही वाचा - 'भारत बचाव' आंदोलनासाठी काँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीकडे रवाना

सरसकट कर्जमुक्ती करावी, वीजचे बिल माफ करावे, बाजारातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरुपी बाजूला करून बाजारसमित्या नियममुक्त कराव्यात, शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, यासारख्या मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले आहे.

Intro:बाईट: रुपेश लंके, शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष

शेतकरी संघटनेचे औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लातूर - उत्पादनापेक्षा उत्पादनावरील खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे कर्जाचा भार वाढत असून राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेती व्यवसयातील बंधने हटवून बाजर आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र द्यावे या मागणीसाठी शेतकरी युवा संघटनेच्यावतीने गुरूवारी औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
Body:निसर्गाचा लहरीपणा आणि प्रशासकीय धोरणे यामध्येच शेतकरी आडकला आहे. काळाच्या ओघात शेतीमधील उत्पादन हे घटत असून तळागळातील शेतकरी अनंत अडवणींना सामोरे जात आहे. शेतकºयांवरील या परस्थितीला शेतीवरील धोरणे आणि कायदेच असल्याचे संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी स्पष्ट केले होते. बाजारसमिती कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा, कमाल जमिन धारण कायदा यामुळे शेतकरी जरीस आला आहे. त्यामुळेच आत्महत्याही वाढत असल्याचा आरोच शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपेश लंके यांनी केला. Conclusion:सरसकट कर्जमुक्ती करावी, विजबिल माफ करावे, बाजारातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी बाजूला काढून बाजारसमित्या नियममुक्त कराव्यात, नुकसान भरपाई त्वरीत शेतकऱ्यांच्या पदरी पडावी यासारख्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.