ETV Bharat / state

प्रवेश यादीत नाव येते की नाही, या नैराश्यातून 'त्या' विद्यार्थ्याची आत्महत्या - प्राचार्य गव्हाणे - लातूर

शाहू महाविद्यालयाची पहिली यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता लागणार आहे. त्यामुळे यादी लागण्याच्या अगोदरच आपला नंबर यादीत लागतो की नाही, या भीतीने अक्षय देवकरने आत्महत्या केली. त्यावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल न उचलण्याविषयी आवाहन केले.

महादेव गव्हाणे
author img

By

Published : Jun 22, 2019, 8:55 AM IST

लातूर - बोर्डाचा निकाल लागल्यापासून अद्यापही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शाहू महाविद्यालयाची पहिली यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता लागणार आहे. यापूर्वीच यादीत नंबर लागतो की नाही, या भीतीनेच अक्षय देवकरने आत्महत्या केली असावी, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी सांगितले आहे.

शाहू महाविद्यालयासह माहिती देताना प्राचार्य

नुकत्याच झाललेल्या १० वीच्या परिक्षेत कळंब तालुक्यातील देवळाली येथील अक्षयने ९४.२० टक्के गुण मिळवले होते. त्याला गणितात ९९ टक्के गुण आहेत. लातूरमधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळावा, यासाठी त्याने नाव नोंदणी केली होती. मात्र, यादी लागण्याच्या एक दिवस अगोदर नंबर लागेल की नाही, या नैराश्यातून अक्षयने स्वतःला संपवून घेतले. कॉलेज प्रवेशाच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याने देवळाली या गावावर शोककळा पसरली आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा टक्का कमी होणार

यंदा संबंध राज्यात निकाल खाली आला आहे. त्यामुळे 4 ते 5 टक्क्यांचा फरक पडणार असून यावेळी 91 टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन डॉ. गव्हाणे यांनी केले.

Intro:शाहू पहिली यादी शनिवारी, 'त्या' विद्यार्थ्यांची आत्महत्या यादीत नाव येते की नाही या नैराश्यातून : डॉ. महादेव गव्हाणे
लातूर : बोर्डाचा निकाल लागल्यापासून अद्यापही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शाहू महाविद्यालयाची पहिली यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता लागणार आहे. यापूर्वीच यादीत नंबर लागतो की नाही या भीतीनेच अक्षय देवकरने आत्महत्या केली असावी असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी सांगितले आहे.
Body:नुकत्याच झाललेल्या १० वी च्या परिक्षेत कळंब तालुक्यातील देवळाली येथील अक्षयने ९४.२० टक्के गुण मिळाले होते. त्याला गणितात ९९ टक्के गुण आहेत. मात्र लातूर मधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळावा यासाठी नाव नोंदणी केली होती. मात्र, यादी लागण्याच्या एक दिवस अगोदर नंबर लागेल की नाही या नैराश्यातून अक्षयने स्वतःला संपवून घेतले. उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. लातूर मधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या नैराश्यातून अक्षय शहाजी देवकर या 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. अक्षयला दहावीत 94.20 टक्के गुण मिळाले मात्र कॉलेज प्रवेशाच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याने देवळाली या गावावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन डॉ. गव्हाणे यांनी केले आहे.
Conclusion:गतवर्षीपेक्षा यंदा टक्का कमी होणार
यंदा संबंध राज्यात निकाल खाली आला आहे. त्यामुळे ४ ते ५ टक्क्यांचा फरक पडणार असून यावेळी 91 टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन डॉ. गव्हाणे यांनी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.