ETV Bharat / state

Mobile Phone Thief : रस्त्याने चालताना सावधान; साडेपाच लाखांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या

शहराच्या विविध भागात रस्त्यावर चालणा-या नागरिकांच्या पाठीमागून येऊन दमदाटी करत जबरदस्तीने मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या तिघांना लातूरच्या शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली आहे. ( Shackles to three who stole mobile phones )

Stole Mobile Phones
लातूर पोलीसांची कारवाई
author img

By

Published : Nov 8, 2022, 2:44 PM IST

Updated : Nov 8, 2022, 3:47 PM IST

लातूर : शहराच्या विविध भागात रस्त्यावर चालणा-या नागरिकांच्या पाठीमागून येऊन दमदाटी करत जबरदस्तीने मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या तिघांना लातूरच्या शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली असून तिनही आरोपी 20-25 वर्ष वयोगटातील आहेत. ( Shackles to three who stole mobile phones )

गुन्हा दाखल : लातूर शहरातील विविध भागातून नागरिकांकडील मोबाईल जबरदस्तीने, दमदाटी करून हिसकावून घेऊन जबरी चोरी केल्याप्रकरणी लातुरच्या शिवाजी नगर व एमआयडीसी पोलीसांत वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास करताना शिवाजी नगर पोलीसांच्या गुन्हे तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपींना लातूर शहरातील विविध ठिकाणाहून ताब्यात घेऊन विचारपूस केली.त्यांची नावे प्रफुल प्रकाश पवार (वय 23 वर्ष,रा.गिरवलकर नगर,लातूर), विशाल विष्णू जाधव (वय 26 वर्ष,रा.पंचवटी नगर,लातूर), महेश नामदेवराव नरहारे (वय 20 वर्ष,रा.महाळग्रा, ता.चाकूर) असे आरोपीचे नावे आहेत.

मुद्देमाल हस्तगत : लातूर शहरातील विविध भागातून नागरिकांकडील मोबाईल जबरदस्तीने, दमदाटी करून हिसकावून घेऊन जबरी चोरी केल्याचे कबूल दिली. चोरलेले विविध कंपनीचे 22 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल जप्त करत पोलीसांनी त्या तिघांना अटक केली आहे. तीन दिवसांपूर्वीच पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या पथकाने मोबाईल हिसकावणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल व मोटारसायकल असा 62 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. शिवाजीनगरच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे मोबाईल हिसकावण्याच्या दोन गुन्ह्याचा उलगडा होऊन आरोपींना अटक केल्यामुळे अगदी विशीतल्या तरुणांमध्येही जबरी चोरीचे प्रमाण अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

पथकाने केली कारवाई : सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात संयुक्त तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार युवराज गिरी, गोविंद चामे, काकासाहेब बोचरे, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर मदने, निलेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Last Updated : Nov 8, 2022, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.