ETV Bharat / state

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्र्यंबकदास झंवर यांचे निधन - passes away

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले त्र्यंबकदास झंवर यांचे गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास निधन झाले. गुरुवारी दुपारी १ वाजता औसा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्र्यंबकदास झंवर
author img

By

Published : Jul 25, 2019, 1:23 PM IST

लातूर- काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अ‌ॅड. त्र्यंबकदास झंवर यांचे गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास निधन झाले. दिवंगत विलासराव देशमुख आणि माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते खंदे समर्थक होते. राजकारणाबरोबरच सामाजिक, धार्मिक कार्यातही त्यांची वेगळी अशी ओळख होती.

त्र्यंबकदास झंवर यांचे निधन

अ‌ॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी जिल्हयात काँग्रेसची जडघडण केली होती. औसाचे नगराध्यक्ष तसेच बाजारसमितीचे सभापती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, मराठवाडा ग्रंथालयाचे अध्यक्ष, भेल प्रकल्पाचे संचालक, महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष यासारखी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. शिवाय सामाजिक कार्यात त्यांनी वेगळा ठसा उमटावला होता. जलयुक्त जिल्हा समितीचे सदस्य असताना जलसाक्षरता चळवळ उभारून जनजागृतीही केली होती. काँग्रेस पक्षातूनच त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक होते. गुरुवारी दुपारी १ वाजता औसा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पक्षाचे ज्येष्ठ नेते त्र्यंबकदास झंवर यांच्या आकस्मित निधनाने द्रष्टा नेता आणि मार्गदर्शक हरपला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि ग्रंथालय चळवळीतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. देशमुख आणि झंवर कुटुंबियांचे स्नेहाचे संबंध आहेत. झंवर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यास ईश्वराने शक्ती द्यावी, अशी प्रतिक्रिया आमदार अमित देशमुख यांनी दिली.

Intro:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्र्यंबकदास झंवर यांचे निधन
लातूर : काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले त्र्यंबकदास झंवर यांचे गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास निधन झाले. स्व. विलासराव देशमुख व माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते खंदे समर्थक होते. राजकारणाबरोबरच सामाजिक, धार्मिक कार्यातही त्यांची वेगळी अशी ओळख होती.
Body:त्र्यंबकदास झंवर यांनी जिल्हयात काँग्रेसची जडघडण केली होती. औसाचे नगराध्यक्ष तसेच बाजारसमितीचे सभापती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, मराठवाडा ग्रंथालयाचे अध्यक्ष, भेल प्रकल्पाचे संचालक, महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष यासर्कशी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. शिवाय सामाजिक कार्यात त्यांनी वेगळा असा ठसा उमटावला होता. जलयुक्त जिल्हा समितीचे सदस्य असताना जलसाक्षरता चळवळ उभारून जनजागृतीही केली होती. काँग्रेस पक्षातूनच त्यांनी राजकीय प्रवासाला सुरवात केली होती. माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि स्व. विलासराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक होते. गुरुवारी दुपारी १ वाजता औसा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Conclusion:ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले
पक्षाचे ज्येष्ठ नेते त्र्यंबकदास झंवर यांच्या आकस्मित निधनाने दूरदृष्टी नेतृत्व आणि मार्गदर्शक हरपला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि ग्रंथालय चळवळीतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. देशमुख आणि झंवर कुटुंबियांचे स्नेहाचे संबंध आहेत. झंवर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यास ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रतिक्रिया आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.