ETV Bharat / state

कोरोना ईफेक्ट : भटक्या विमुक्त संघटनेकडून गरीब लोकांना अन्नधान्याचे वाटप - corona effect news

ज्या समाजातून आपण आलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही माणुसकीची भावना जोपासत झोपडपट्टीतील गरीब माणसांना मदत करण्यासाठी भटक्या-विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते 'कत्तीकार' विलास माने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रविवारी 29 मार्चला आपल्या 'उपरा' या निवासस्थानी शंभर गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, गोडे तेलाचे एक किलोचे एक पाकिट, कपड्याचे व अंगाचे साबण यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

scheduled tribe leader distribute food for poor in laturs nilanga taluka due to corona effect
कोरोना ईफेक्ट : उपासमार रोखण्यासाठी झोपडीतील लोकांना दहा क्विंटल तांदळासह किराणामालाचे वाटप
author img

By

Published : Mar 29, 2020, 5:28 PM IST

लातूर - जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका मोलमजुरी करणाऱ्या व भटक्या विमुक्त समाजाला बसला आहे. या लोकांना मजुरी व पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे होणारे हाल ओळखून मदतीकरता निलंग्यातील भटक्या विमुक्त संघटना व श्रमिक विकास संस्था धावली. या संस्थांनी 100 गरजू कुटुंबांना दहा क्विंटल तांदूळ व किराणामालाचे वाटप केले.

scheduled tribe leader distribute food for poor in laturs nilanga taluka due to corona effect
मानवतेसाठी एक हात मदतीचा, भटक्या विमुक्त संघटनेकडून गरीब लोकांना अन्नधान्याचे वाटप

निलंगा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे गरीब मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची वसती आहे. यासोबतच निलंगा येथे वडार, मसणजोगी, कैकाडी, पारधी, शिकलकरी, घिसाडी यासह भटक्या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहतात. जगासह देशात कोरोना या या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या झोपडपट्टीतील व पाली वरील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ज्या समाजातून आपण आलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही माणुसकीची भावना जोपासत झोपडपट्टीतील गरीब माणसांना मदत करण्यासाठी भटक्या-विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते " कत्तीकार " विलास माने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रविवारी 29 मार्चला आपल्या "उपरा " या निवासस्थानी शंभर गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, गोडे तेलाचे एक किलोची एक पाकीट, कपड्याचे व अंगाचे साबण यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी कलावती माने, विकास माने, दशरथ जाधव , वैजनाथ जाधव, भाग्यश्री माने, आशाताई जाधव, इंदरकौर टाक आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.