ETV Bharat / state

'काँग्रेस जिंकण्यासाठी नाही तर अस्तित्वासाठी निवडणुकीच्या रिंगणात'

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी, काँग्रेस ही सध्या जिंकण्यासाठी निवडणूक लढवत नाही तर अस्तित्वासाठी लढत असल्याचे म्हटले आहे.

रावसाहेब दानवे संभाजी पाटील निलंगेकर लातूर येथील सभेत बोलताना
author img

By

Published : Oct 18, 2019, 4:25 PM IST

लातूर - शहरातील महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी दानवे यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. काँग्रेस ही जिंकण्यासाठी नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी निवडणूकीच्या रिंगणात असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महापौर सुरेश पवार, उमेदवार शैलेश लाहोटी आदी नेते उपस्थित होते.

रावसाहेब दानवे, संभाजी पाटील निलंगेकर लातूर येथील सभेत बोलताना

देशमुखांवर केली टीका

६० वर्ष केवळ आश्वसनांची बोळवण काँग्रेसने केली होती. उजनीचे पाणी लातूरकरांना, हे त्यापैकीच एक आश्वासन आहे. ज्या लातूरकरांमुळे येथील नेत्यांना मुख्यमंत्री पद मिळाले त्यांनी लातूरकरांची तहान भागवली नाही. मात्र, २०१४ नंतर चित्र बदलले आहे. गरीब जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी विराजमान केले असून आता देशात काँग्रेस सर्वात गरीब झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते जिंकण्याच्या उद्देशाने नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी लढत असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री रावसाहेब यांनी केला.

हेही वाचा... महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?

पाणीचोरांना शिक्षा देणार का..?

लातूरची पाणीटंचाई ही काही नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे. मांजरा धरणातील पाणी लातूर येत असताना शहरालगतच्या कारखान्यासाठी देशमुख यांनी पाणी चोरले असल्याचा आरोप पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केला. त्यामुळे पाणी चोरणाऱ्यांना या निवडणुकीतून शिक्षा देणार की नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केला.

हेही वाचा... बंडखोर उमेदवार व माजी आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी​​​​​​​

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असला तरी लातूरचे राजकारण केवळ उजनीच्या पाण्याभोवती फिरताना दिसत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा प्रश्न यावेळी तरी मार्गी लागणार का? हे पहावे लागेल.

Intro:काँग्रेस जिंकण्यासाठी नाही तर अस्तित्वासाठी निवडणुकीच्या रिंगणात : रावसाहेब दानवे
लातूर : ६० वर्ष केवळ आश्वसनांची बोळवण काँग्रेसने केली होती. उजणीचे पाणी लातूरकरांना त्यापैकीच एक असून ज्या लातूरकरांमुळे यांना मुख्यमंत्री पद मिळाले त्यांनी साधी लातूरकरांची तहान भागवली नाही. मात्र, २०१४ नंतर चित्र बदलत आहे. गरीब जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी विराजमान केले असून आता देशात काँग्रेस सर्वात गरीब झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते जिंकण्याच्या उद्देशाने नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी लढत असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री रावसाहेब यांनी केला.

Body:विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असला तरी केवळ उजनीच्या पाण्याभोवती येथील राजकारण फिरत आहे. गेल्या 20 वर्षोपासून निवडणुकीचा हाच मुद्दा असून यावेळी पाणी नाही आणले तर आहे त्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे प्रतिनिधी सांगत आहेत. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा प्रश्न खरच मार्गी लागणार का पुन्हा हा मुद्दा निवडणुकीपूरताच मर्यादित राहणार हे पहावे लागेल. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांनी आज लातुरात जाहीर सभा घेऊन काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ६० वर्षात सरकारी योजना केवळ कागदावरच राहिल्या... याचा फायदा जनतेला नाही पण राजकारणातील काही घटकांना मात्र नक्की होत असल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ पासून राज्यासह देशात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. जनतेला विकास कोण करणार हे अवगत झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या अस्तित्वाची राहणार आहे. शिवाय देशमुख घरण्यामुळे लातूरची ओळख नाही तर लातूरकरांमुळे त्यांची ओळख असल्याचे सांगितले. राज्याच्या सर्वच पदी असतानाही पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. मांजर डोळे मिटवून दूध पिते..यांनी तर मांजरेचे पाणी चोरून कारखाने जोपासले असल्याची टीका केली. यावेळी खा. सुधाकर शृंगारे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महापौर सुरेश पवार, उमेदवार शैलेश लाहोटी, माजी खा. गोपाळ पाटील, यांची उपस्थिती होती.

Conclusion:पाणीचोरांना शिक्षा देणार का..? - पालकमंत्री
लातूरची पाणीटंचाई ही काही नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे. मांजरा धरणातील पाणी लातूर येत असताना शहरालगतच्या कारखान्यासाठी देशमुख यांनी पाणी चोरले असल्याचा आरोप पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. त्यामुळे पाणी चोरणाऱ्यांना या निवडणुकीतून शिक्षा देणार की नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.