लातूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने लातूर दौऱ्याबाबत संदिग्धता होती. मात्र, राज्य कृषी प्रदर्शनाच्या निरोप समारंभ कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. परंतु यावेळी दीड मिनिटांचे भाषण करून ते परतले. प्रकृती ठीक नाही म्हणून जास्त बोलणार नसल्याचे सांगत त्यांनी ९ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितींना केले.
हेही वाचा... काश्मीरवरील कविता म्हणून अर्थसंकल्प प्रत्यक्ष सादर करण्यास सुरुवात
मनसेच्या राज्य कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगत आज तुमची निराशा होणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी शा कृषी प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. देशात घुसखोरी करणाऱ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कृषी प्रदर्शनाची पाहणी करून मनसे जिल्हा अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी आयोजन केलेल्या या प्रदर्शनाचे कौतुक केले. शिवाय आगामी काळात दौऱ्याची सुरवात मराठवाड्यातूनच होणार असून त्यावेळी योग्य ते बोलेल, असे बोलत त्यांनी रजा घेतली.
हेही वाचा... अर्थसंकल्प : 99 हजार 300 कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद