ETV Bharat / state

'त्या' प्रवाशांची रात्रीतून धूम; लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी घेतले होते ताब्यात

या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची सोय करून देखील हे पळून गेल्याचे तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले आहे.

latur corona
latur corona
author img

By

Published : Apr 17, 2020, 11:33 AM IST

लातूर - जिल्ह्याच्या सीमा सील असतानाही पुणे येथून सीमा ओलांडत असलेले 28 प्रवासी रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यांची सर्व सोय प्रशासनाच्यावतीने करण्यात आली असतानाही या प्रवाशांनी रात्रीतून धूम ठोकली असून मुखेड, औराद बऱ्हाळीकडे मार्गस्थ झाले आहेत.

प्रवाशांची रात्रीतून धूम; लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी घेतले होते ताब्यात

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व जिह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. असे असतानाही अनेकजण आपले गाव जवळ करत आहेत. पुणे येथून मूळचे मुखेड व औराद बऱ्हाळी येथील 28 प्रवासी प्रवास करीत असताना रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

नाकाबंदीचे उल्लंघन केल्याने या सर्वांना पिंपळफटा येथे अडवले व एका शाळेत मुक्कामाची सोय करण्यात आली होती. 8 एप्रिलपासून ते रेणापूर येथील शाळेत होते. मात्र, बुधवारी रात्री हे प्रवासी दोन जीप घेऊन पळून गेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.