ETV Bharat / state

लातूरात 500 फळझाडांचा ऑक्सिजन पार्क; पर्यावरण राज्यमंत्र्यांकडून वृक्षारोपण

author img

By

Published : Jun 6, 2021, 12:13 PM IST

5 जून हा दिवस दरवर्षी 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने लातूरात 500 फळझाडांचे ऑक्सीजन पार्क तयार करण्यात आले आहे. यावेळी पर्यावरण राज्यमंत्र्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण राज्यमंत्र्यांकडून वृक्षारोपण
पर्यावरण राज्यमंत्र्यांकडून वृक्षारोपण

लातूर - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, इंडीयन मेडीकल असोसिएशन व लातूर ग्रीन वृक्ष टीम यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड करण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फळ झाडांच्या ऑक्सीजन पार्कसाठी 500 रोपांची लागवड करण्यात आली आहे.

लातूरात 500 फळझाडांचा ऑक्सिजन पार्क

प्रत्येक नागरिकाने किमान 10 झाडे लावणे गरजेचे

5 जून हा दिवस दरवर्षी 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनचे अधिकचे महत्व नागरिकांना प्रकर्षाने समजले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरात किमान 10 झाडे लावणे गरजेचे असल्याचे मत संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल, उपायुक्त मंजुषा गुरमे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही.पी.शेळके, कॉंग्रेस नेते अभिजित देशमुख, सचिन क्षिरसागर, डॉ.पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावर्षासाठीची थीम 'इकोसिस्टीम रिस्टोरेशन'

1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकार, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक थीम ठरवली जाते आणि एक देश त्यासाठी 'होस्ट' अथवा यजमान असतो. 2021 वर्षासाठीची थीम 'इकोसिस्टीम रिस्टोरेशन' (Ecosystem Restoration) ही आहे. म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचे संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणे. वर्षानुवर्षे आपण पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत. परिणामी पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या परिसंस्था इकोसिस्टीमचे (Ecosystem) नुकसान रोखते. ते थांबवून ही हानी भरून काढण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधले गेले तर त्याचा फायदा मानव जातीलाही होईल, गरीबी कमी होईल, हवामान बदल (Climate Change) कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत, असे युनायटेड नेशन्सने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगितले आहे.

यावर्षीचे पर्यावरण दिनाचे यजमानपद पाकिस्तानकडे

यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरवर्षी एका देशाकडे या दिनाचे यजमानपद असते आणि या देशात अधिकृत कार्यक्रम पार पडतात. जगभरात विविध व्यक्ती, संस्था, उद्योग यांनी पर्यावरणाच्या हितासाठी काही उपक्रम राबवावेत, आपल्या कार्यपद्धतीत पर्यावरणस्नेही वा पर्यावरणपूरक बदल घडवून आणावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. शिवाय '#GenerationRestoration' हा हॅशटॅग यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनासाठी ठरवण्यात आला आहे.

हेही वाचा - ‘माझी वसुंधरा’ पुरस्‍काराने लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीचा सन्‍मान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.