ETV Bharat / state

एसटी बसमध्ये गोळीबार करणारा 'तो' होता माजी सैनिक - hospital

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तो जखमी असल्याने तो कोणत्यातरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईल यांचा अंदाज पोलिसांनी घेतला आणि  शहरातील दवाखान्यात शोध मोहीम सुरू केली.

'तो' गोळीबार करणारा माजी सैनिक
author img

By

Published : Apr 26, 2019, 10:50 AM IST

लातूर - गुरुवारी मध्यरात्री लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या पंढरपूर-हदगाव बसमध्ये बसून गोळीबार करणारा इसम हा सेवानिवृत्त माजी सैनिक असल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात बंदुकीमधील गोळी खिडकीच्या गजाला आदळून परत त्यालाच लागली. त्यानंतर तो माजी सैनिक घटना स्थळावरून पसार झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तो जखमी असल्याने तो कोणत्यातरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईल यांचा अंदाज पोलिसांनी घेतला आणि शहरातील दवाखान्यात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, हा व्यक्ती लातूरच्य शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे तपासात समजले. पोलिसांनी तातडीने शासकीय रुग्णालय गाठले असता, तो अहमदपूर तालुक्यातील माजी सैनिक बालाजी शंकरराव मुखेडे असल्याचे समोर आले आहे.

बसमध्ये चुकून गोळीबार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये त्यांच्या हाताच्या करंगुळीला जखम झाली असून उपचारानंतर रुग्णालयातून त्याला सोडण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यातील होकर्णा गावचा रहिवाशी आहे. सध्या तो अहमदपूर शहरात राहतोय. कशामुळे या इसमाने गोळीबार केला याबद्दल पोलीस तपास करत आहेत.

Intro:'तो' गोळीबार करणारा माजी सैनिक
लातुर : गुरुवारी मध्यरात्री लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या असलेल्या पंढरपूर हदगाव बसमध्ये बसून गोळीबार करणारा इसम हा सेवानिवृत्त माजी सैनिक असल्याचे समोर आले आहे. Body:गोळीबारात पिस्टल मधील गोळी खिडकीच्या गजाला आदळून परत त्याला लागली. यामध्ये सदरचा इसम घटना स्थळावरून पसार झाला होता. पोलिसांना घटनेबद्दल समजताच तातडीने धाव घेतली व शहरातील दवाखान्यात शोध मोहीम सुरु केली. दरम्यान हा व्यक्ती लातूरच्य शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे तपासात समजले. पोलिसांनी तातडीने शासकीय रुग्णालय गाठले असता तो अहमदपूर तालुक्यातील माजी सैनिक बालाजी शंकरराव मुखेडे असल्याचे समोर आले आहे. बसमध्ये चुकून गोळीबार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये त्यांच्या हाताच्या करंगुलीला जखम झाली असून उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यातील होकर्णा गावचा रहिवाशी आहे.Conclusion: सध्या तो अहमदपूर शहरात राहतोय नेमके कश्यामुळे या इसमाने गोळीबार केला याबद्दल पोलिस तपास करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.