ETV Bharat / state

लातूरच्या अहमदपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Latur Crime news

पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Physical abuse on girl
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
author img

By

Published : Jan 21, 2020, 7:17 PM IST

लातूर - अहमदपूर तालुक्यात 6 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सचिन संजय गिरी (वय 22) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - महाबीजच्या अहवालाने विद्यापीठांच्या बीज संशोधनावर प्रश्नचिन्ह ; शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर प्रकार उघडकीस

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील एक महिला व त्यांची 6 वर्षीय मुलगी आपल्या आजारी आजोबांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी गावातील सचिन गिरी याने पीडितेला कुरकुरे, चिप्स व चॉकलेट तसेच मोबाईलवर गेम खेळायला देण्याच्या बहाण्याने घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा - शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी दोन रुग्णांचा अचानक मृत्यू; चार जणांवर आयसीयूमध्ये उपचार

याबाबत पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील व पोलीस निरीक्षक सुनिल कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एन. व्ही. जाधव हे अधिक तपास करत आहेत.

Intro:सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार ; तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल
लातूर : अहमदपूर तालुक्यातील शेनकुड येथे सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावीस वर्षीय तरूणा विरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 
Body:तालुक्यातील शेनकुड येथे एक महिला व त्यांची सहा वर्षीय मुलगी आपल्या आजारी आजोबांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी गावातील सचिन संजय गिरी (22 वर्ष) या पिडीताच्या चुलत मामाने सदर पिडीतास दुपारी दीडच्या सुमारास कुरकुरे, चिप्स व चाॅकलेटचे तसेच मोबाइलवर गेम खेळायला देतो म्हणून घरात घेऊन गेले व मुलीवर अत्याचार केला. या संदर्भात पिडीताच्या आईने यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विरोधात पास्को कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Conclusion:उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.अश्विनी पाटील व पोलिस निरीक्षक सुनिल कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक एन.व्ही.जाधव करीत आहेत.   
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.