लातूर - दिल्ली येथील शाहीनबाग व इतर ठिकाणी संवैधानिक अधिकाराने करत असलेल्या आंदोलकांवर अमानुष गोळीबार झाला. या घटनेच्या निषेधार्थ निलंगयात चक्क गाढवाला हार घालून निवेदन देऊन निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या.
सध्या देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून एनआरसी, सीएए, एनपीआर या कायद्याला विरोध होत आहे. त्यातच दिल्ली येथील शाहीनबाग येथे तब्बल 52 दिवसांनी महिला छोट्या छोट्या मुलांना घेऊन दिवस रात्र धरणे आंदोलनास बसल्या आहेत. त्यांच्यावर अनेक वेळा गोळीबार करण्यात आला आहे. त्यात दिल्ली पोलिसांनी योग्य ती तत्परता दाखवली नाही. गृहमंत्री गृहखाते सांभाळण्यात असमर्थ ठरले आहेत. त्यांनी गृहखात्याचा राजीनामा द्यावा ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दिल्ली येथील निवडणुकीत गल्लोगल्ली प्रचार करत फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
यावेळी दिल्ली पोलीस मुर्दाबाद, दिल्ली पोलीस शरम करो, शरम नही तो डूब मरो अशा घोषणा देण्यात आल्या. मुजीब सौदागर सबदर कादरी तुषार सोमवंशी महमुद शेख महेश ढगे गौस शेख आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.