ETV Bharat / state

'ओेएलएक्स'वरुन मागवली दुचाकी; पदरी पडली फक्त बनावट कागदपत्रे - आर.सी. बुक

लातुरात एका तरुणाला दुचाकी खरेदी करण्याच्या नादात तब्बल ४१ हजाराला गंडा बसला आहे. 'ओएलएक्स' या ऑनलाईन साईटवरून त्याने दुचाकी मागवली. मात्र, पदरी केवळ दुचाकीची कागदपत्रे पडली असून त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ओएलएक्सवरून दुचाकी मागवली पण मिळाली केवळ बनावट कागदपत्रे
author img

By

Published : Jun 7, 2019, 11:57 AM IST

लातूर - दिवसेंदिवस ऑनलाईनद्वारे वस्तू खरेदीवर सर्वांचाच भर आहे. विशेषतः तरुणाईला ही प्रक्रिया अधिक सोयीची असल्याचे वाटते. मात्र, लातुरात एका तरुणाला अशाच प्रकारे दुचाकी खरेदी करण्याच्या नादात तब्बल ४१ हजाराला गंडा बसला आहे. 'ओएलएक्स' या ऑनलाईन साईटवरून त्याने दुचाकी मागवली. मात्र, पदरी केवळ दुचाकीची कागदपत्रे पडली असून त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Latur
युवकाने गुगल पे अकाऊंटवरून पाठवले पैसे

लातूर येथे सेल्समन म्हणून काम करणारे गणेश पाचंगे यांनी ओएलएक्सवर ७ महिन्याची दुचाकी विक्रीस असल्याची जाहिरात १ जून ला पाहिली. त्यामुळे पाचंगे यांनी संबंधित जाहिरातीवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली. यावेळी मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्तीने गाडीचा नंबर एमएच १४ एचइ ८८०२ असून गाडीमालकाचे आधारकार्ड, गाडीचे आर. सी बुक, आर्मी कार्ड पाठवून स्वतःचे नाव किसन मोरे असे सांगितले होते.

त्यानुसार पाचंगे यांनी किसन मोरे यांच्या खात्यावर गूगल पे अकाउंटवरून ४१ हजार रुपये पाठवले आणि २ जूनपर्यंत सर्व व्यवहारही झाला, तर आता प्रत्यक्षात गणेश पाचंगे यांना दुचाकीचे वेध लागले होते. परंतु त्यांचे हे स्वप्न हवेतच विरत असताना दिसत आहे. कारण मागील ४ दिवसांपासून संबंधित किरण मोरे यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय पाचंगे यांना पाठवण्यात आलेली कागदपत्रेही खोटी असल्याचे समोर आले आहे.

मागील ४ दिवसापासून पाचंगे हे त्या व्यक्तीची फोनची वाट पाहत होते. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओएलएक्सद्वारे ऑनलाईन दुचाकी खरेदी करण्यात फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी गांधी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गणेश पाचंगे यांनी केली आहे.

Intro:ओलक्स वरून मागवली दुचाकी पदरी पडली फक्त बनावट कागदपत्रे
लातूर : दिवसेंदिवस ऑनलाईनद्वारे वस्तू खरेदीवर सर्वांचाच भर आहे. विशेषतः तरुणाईला ही प्रक्रिया अधिक सोयीची असल्याचे वाटते. मात्र, लातुरात एका तरुणाला अशाच प्रकारे दुचाकी खरेदी करण्याच्या नादात तब्बल 41 हजाराला गंडा बसला आहे. ओलक्स ऑनलाईन साईटवर त्याने दुचाकी मागितली मात्र पदरी केवळ दुचाकीची कागदपत्रे पडली असून त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Body:त्याचे झाले असे, लातूर येथे सेल्समन म्हणून काम करणारे गणेश पाचंगे यांनी ओलक्सवर 7 महिन्याची दुचाकी विक्रीस असल्याची जाहिरात 1 जून रोजी पहिली. मग काय 7 महिन्याची दुचाकी आणि तेही 41 हजारात म्हणल्यावर पाचंगे यांनी संबंधित जाहिरातीवर दिलेल्या नंबरशी संपर्क करून अधिक माहिती घेतली. त्यानुसार गाडीचा नंबर एम.एच.14 एच.इ 8802 असून गाडीमलकाचे आधारकार्ड, गाडीचे आर. सी बुक, आर्मी कार्ड मोबाईलवरून पाठवून स्वतःचे नाव किसन मोरे असे सांगितले होते. त्यानुसार पाचंगे यांनी किसन मोरे यांच्या खात्यावर गूगल पे अकाउंट वरून 41 हजार रुपये पाठवले आणि 2 जूनपर्यंत सर्व व्यवहारही झाला. मात्र, प्रत्यक्षात आता गणेश पाचंगे यांना दुचाकीचे वेध लागले होते. परंतु त्यांचे हे स्वप्न हवेतच विरत असताना दिसत आहे. कारण गेल्या 3 दिवसांपासून संबंधित किरण मोरे यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय पाचंगे यांना पाठविण्यात आलेली कागदपत्रेही खोटी असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन दिवसापासून पाचंगे हे त्या इसमाच्या फोन ची वाट पाहत होते. परंतु आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आज पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओलक्सद्वारे ऑनलाईन दुचाकी खरेदी करण्यात फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी गांधी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. Conclusion:त्यानुसार पोलीस तपास करीत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गणेश पाचंगे यांनी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.