लातूर - वाळू उपसा करणाऱ्या कंत्राटदाराकडे 25 हजारांची लाच मागितली. तडजोडअंती 18 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही घटना जळकोट तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घोणशी येथील वाळू उपशासाठी कंत्राटदाराला तलाठी ज्ञानोबा हणमंतराव करमले आणि गावच्या हरिराम जाणतीने यांनी मदत केली. मात्र, कामाला सुरुवात होताच त्यांच्याकडे तब्बल 25 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 18 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, खासगी व्यक्ती आणि तलाठी करमले यांच्या सततच्या मागणीला त्रासून कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार 18 हजार रुपये स्वीकारताना हरिराम जनातीने यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तलाठी ज्ञानोबा करमले आणि हरिराम जानतीने यांच्यावर जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.