लातूर - परिचारिकांनी कोरोना संसर्गाच्या संकटकालीन परिस्थितीत बजावलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत लातूरच्या परशुराम जयंती उत्सव समितीने परिचारिकांच्या कल्याणार्थ एक लाखाचा निधी सुपूर्द केला आहे. यावेळी जयंती समितीचे सदस्य यशवंत आंदूरकर यांनी वैयक्तिक रु.५००० निधी संघटनेस भेट म्हणून दिला.
परिचारिकांच्या कल्याणार्थ 1 लाखाचा निधी -
परशुराम जयंती उत्सव समिती दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवते. या जयंती उत्सव समितीने यावर्षी लातूरच्या स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था येथील परिचारिकांच्या कल्याणार्थ १ लाखाचा निधीसह कृतज्ञता सन्मानपत्र महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
निधीतून अत्यावश्यक चेंजिंग रुम व पाळणा घरासाठी साहित्य खरेदी -
गत वर्षभर समाजातील विविध घटकांकडून परिचारिकांनी केलेल्या सेवेबद्दल शाब्दिक कौतुक केले. मात्र, परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परशुराम जयंती उत्सव समितीने निवडलेला मार्ग अनोखा, अतुल्य व समाजातील सर्वांसाठी अनुकरणीय आहे. जयंती समितीकडून प्राप्त निधीतून परिचारिकांसाठी अत्यावश्यक चेंजिंग रुम व पाळणा घरासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचे मत परिचारिका संघटनेच्या राज्य सचिव सुमित्रा तोटे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
हे होते उपस्थित -
यावेळी श्री परशुराम जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संजय पांडे, यावर्षीचे जयंती समिती अध्यक्ष डॉ.रविराज पोरे, संजय निलेगावकर, जगदिश कुलकर्णी, डॉ.नितीन सास्तुरकर, ईश्वर कुलकर्णी, प्रसाद उदगीरकर, पापाशेठ ताथोडे, सुधाकर जोशी तसेच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे संजीव लहाने, रेणुका रेड्डी, शिला कांबळे, विवेक वागलगावे, जगन्नाथ कोरके यांची प्रमुख उपस्थिती होती.