ETV Bharat / state

Brain Attack To PSI : लातूरात 'ऑन ड्युटी’ पोलीस अधिकाऱ्याचा 'ब्रेन अटॅक'ने मृत्यू

जिल्ह्यातील अहमदपूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावर असताना 'ब्रेन अटॅक' (Brain Attack To PSI) आल्याने मृत्यू (on duty police officer died of brain attack) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमनाथ कोंडीराम कांबळवाड ( वय 52 वर्ष ) असे मयत पोलीस अधिका-याचे नाव आहे. (Latur Latest News), (Latur Crime)

Brain Attack To PSI
'ब्रेन अटॅक' च्या झटक्याने मृत पावलेले पीएसआय
author img

By

Published : Oct 30, 2022, 8:38 PM IST

अहमदपूर/लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावर असताना 'ब्रेन अटॅक' (Brain Attack To PSI) आल्याने मृत्यू (on duty police officer died of brain attack) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमनाथ कोंडीराम कांबळवाड ( वय 52 वर्ष ) असे मयत पोलीस अधिका-याचे नाव आहे. (Latur Latest News), (Latur Crime)

उपचारादरम्यान मृत्यू - मयत सोमनाथ कांबळवाड हे अहमदपूर येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. कर्तव्यावर असतानाच त्यांना 'ब्रेन अटॅक' आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू मृत्यू झाला. मयत सोमनाथ कांबळवाड हे अहमदपूर तालुक्यातील मौजे परचंडा गावचे रहिवासी असून 1993 मध्ये पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, वाढवणा, जळकोट, उदगीर,अहमदपूर पोलीस ठाण्यात सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - मयत सोमनाथ कांबळवाड यांच्यावर त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अहमदपूरचे पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड, किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार यांच्यासह पोलीस दलातील कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.