ETV Bharat / state

लातुरात मतदार राजाचे तुतारी वाजवून स्वागत, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनोखी शक्कल - पाळणाघर

लातूरातील सुशीलादेवी मतदान केंद्रावर मतदार राजाचे तुतारी वाजून स्वागत.... दिव्यांगासाठी व्हीलचेअरची तर सोय माता मतदारांच्या बालकांसाठी पाळणाघरही सज्ज.. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून अनोखी शक्कल

मतदार राजाचे तुतारी वाजून स्वागत
author img

By

Published : Apr 18, 2019, 11:27 AM IST

Updated : Apr 18, 2019, 3:17 PM IST

लातूर - मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सुशिलादेवी देशमुख विद्यालयात प्रशासनाने एक अनोखा उपक्रम राबिवला आहे. आज मतदान सुरू झाल्यापासून मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे चक्क तुतारी वाजवून स्वागत करण्यात येत आहे. तसेच मतदान झाल्यानंतर मतदाराला कक्षाबाहेर सोडण्यापर्यंत स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

मतदार राजाचे तुतारी वाजून स्वागत

लातुरात मतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी दोन मतदान केंद्रावर अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात आहे. मतदार हा राजा असून त्याच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर तुतारी वादक तैनात करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअरचीही सोय करण्यात आली आहे. नव मतदारांची संख्या वाढल्याने या ठिकाणी सेल्फी पॉइंटही सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी हे दिव्यांग आहेत.

या ठिकाणी येणाऱ्या लहान मुल असलेल्या माता मतदारांसाठी बालसंगोपन कक्षात सेविकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच बालगोपालांना खेळणीही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर पाळणाघर घर उपलब्ध करून दिल्याने महिलांना मतदान करणे सोपे जात आहे. एवढेच नाहीतर या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी आरोग्य कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान कक्षावर एकाद्या उत्सवाप्रमाने वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांच्या सेवेला जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असून मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जात आहे.

Intro:मतदार राजाचे तुतारी वाजून स्वागत अन सर्व सोई- सुविधा असलेले हे लातूरतील मतदार केंद्र
लातूर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. शहरातील सुशिलादेवी देशमुख विद्यालयात प्रशासनाने एक अनेक उपक्रम राबिवले स्वागतापसून मतदान झाल्यानंतर मतदाराला कक्षबाहेर सोडण्यापर्यंत स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. प्रवेशद्वारावर तुतारी वाजवून मतदार प्रवेश करीत आहे.

Body:लातुरात मतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी दोन मतदान केंद्रावर अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात आहे. मतदार हा राजा असून त्याच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर तुतारी वादक तैनात करण्यात आले आहे.एवढेच नाही दिव्यागं व्यक्तींना व्हीलचेअर सोय करण्यात आली आहे. नव मतदारांची संख्या वाढल्याने सेल्फी पॉइंटही करण्यात आला आहे. या मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी हे दिव्यांग आहेत. बालसंगोपन कक्षात सेविकांची नेमणूक करून बालगोपाल यांना खेळणी साहित्य तसेच पाळणाघर घर केल्याने महिलांना मतदान करणे सोपे जात आहे. प्राथमिक उपचारासाठी आरोग्य कशी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान कक्षावर एकाद्या उत्सवाप्रमाने वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांच्या सेवेला जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असून मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जात आहे.

Conclusion:सकाळी पर्यंत 10 टक्के पर्यंत मतदान झाले असून दिवसभर अशीच सेवा सुरू ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.
Last Updated : Apr 18, 2019, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.