लातूर - अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे चार दिवसांपूर्वी 350 हुन अधीक कोंबड्यांचा अचानक मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यांच्या मृत्यूबाबतचा अहवाल आला असून बर्डफ्लूमुळेच ही घटना झाल्याचे उघड झाले आहे. त्यांनतर धोका वाढला असून एका रात्रीतून 10 हजारहून अधिक कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना 8 महिन्यांपूर्वी कोंबड्यावर संक्रात आली होती. या संकटातून पशुपालक सावरत असतानाच आता बर्डफ्लूने डोकेवर काढले आहे. याची सुरवात अहमदपूर तालुक्यात झाली होती. तालुक्यातील केंद्रेवाडी येथे 350 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात बर्डफ्लू दाखल झाल्याची चुनचून लागली होती. असे असतानाच या कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लूनेच झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर 10 किमी परिसरातील कोंबड्यांची तपासणी करण्यात आली आहे.एवढेच नाही तर तब्बल 10 हजार हुन कोंबड्या ह्या नष्ट करण्यात आल्या आहेत. या भागातून कोणत्याही प्रकारची पशु, अंडी, किंवा मांस विक्रीस आणि वाहतुकीस बंद करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. केंद्रेवाडी येथे घडलेल्या घटनेच्या बाजूलाच 8 हजार कोंबड्यांचे कुक्कुटपालन होते. शिवाय लहान- मोठे व्यावसायिक होते. एकूण 10 हजार हुन अधिक कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासन तत्पर -
बर्डफ्लूने कोंबड्यांचा मृत्यू वाढत आहे. याचा धोका अधिक वाढू नये म्हणून जिल्ह्यात समित्या नेमण्यात आल्या आहेत. पाच जणांचे एक अशी 30 पथके नेमण्यात आली आहेत. अशा घटनांवर ही समिती लक्ष ठेऊन आहे.
पशुमालकांमध्ये पुन्हा धास्ती -
कोरोनाच्या सुरवातीच्या काळात चिकनमुळेच कोरोनाची लागण होते असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे 10 रुपयाला एक कोंबडी अशी अवस्था झाली होती. यातून पशुमालक सावरत असतानाच आता बर्डफ्लूने डोकेवर काढले आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.