ETV Bharat / state

निलंगा तहसील कार्यालयासमोर मनसेचे धरणे आंदोलन, पीक नुकसान भरपाईसाठी केली घोषणाबाजी - निलंगा मनसे बातमी

सोयाबिन पिकाचे मोठे नुकसाने झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी मनसेने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे.

agitator
आंदोलनकर्ते
author img

By

Published : Sep 3, 2020, 3:29 PM IST

Updated : Sep 3, 2020, 7:31 PM IST

निलंगा (लातूर) - तालुक्यातील अनेक गावामध्ये सोयाबीन पीकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. कारण, सोयाबीनला कमी शेंगाची लागण झाली आहे. त्यातच सोयाबीनवर किड्यांचा संसर्ग होऊन करप्या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. म्हणून शासनाने ताबडतोब अशा सोयाबीनचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत मनसेने तहसीलदारांकडे केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत मागणी केली आहे.

आंदोलनकर्ते

तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे सोयाबीन आहे. पण, बोगस बियाणे बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट आले. सुदैवाने चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन चांगले आले असे वाटत असतानाच सोयाबीनच्या शेंगाची लागण कमी झाली. त्यातच करप्या, कीड लागून सोयाबीनची पाने अनेक ठिकाणी गळून गेली. सोयाबीन वाळलेसुद्धा सोयाबीनच्या उत्पन्नावरच शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक व्यवहार चालतात आणि नेमके तेच पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

मूग, उडीद ही सुद्धा खरिपाची पिके या वर्षी शेतकऱ्याच्या हाताला लागली नाहीत व त्याचे मोठे नुकसान झाले. बोगस बियाणे बाजारात आणलेल्या शासनाने किमान आता तरी अशा शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करावे. यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी निलंगा तहसील समोर धरणे आंदोलन केले. तिथेच तहसीलदारांना बोलवून सोयाबीनची पेंडी भेट दिली.

शासनाने विमा कंपन्यांकडून व स्वतः मदत जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आधार देणे गरजेचे आहे व हे नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा डॉ.नरसिंह भिकाणे यांनी दिला. या आंदोलनात तालुकाध्यक्ष सूरज पटेल, शहराध्यक्ष प्रदीप शेळके, नजीर मुजावर, यश भिकाणे, अरबाज पठाण, जीवन धोत्रे, नारायण कोकरे, सुदर्शन काळे, पावन काळे, विनोद जेकाकुरे, शफीक शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा - डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची अंतिम इच्छा पूर्ण ; भक्तीस्थळावर अंत्यसंस्कार

Last Updated : Sep 3, 2020, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.