ETV Bharat / state

भावाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी धीरज देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे - mla Amit Deshmukh

डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पानगाव येथे जतन करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आमदार अमित देशमुख यांनी चैत्य स्मारकाच्या उभारणीसाठी शासनाकडून ४ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करून घेतले होते. या निधीपैकी उर्वरित ७० लाख रुपयांचा निधी शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

latur
धीरज देशमुख
author img

By

Published : Dec 6, 2019, 11:55 PM IST

लातूर - रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करण्यात आल्या असून याठिकाणी भव्य चैत्य स्मारक उभारले जात आहे. यासाठी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, यामधील उर्वरित ७० लाख रूपये रक्कम मंजूर होणे बाकी आहे. त्यामुळे निधी मंजूर करून स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे.

latur
चैत्य स्मारक

डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पानगाव येथे जतन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूरनंतर पानगाव हे अनुयायांचे मोठे प्रेरणास्थान आहे. मराठवाड्याचे भूषण असलेल्या या स्थळाला महाराष्ट्रासह शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून अनुयायी भेट देत असतात. या प्रेरणास्थळाच्या ठिकाणी स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आमदार अमित देशमुख यांनी चैत्य स्मारकाच्या उभारणीसाठी शासनाकडून ४ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करून घेतले होते. या निधीपैकी ४ कोटी २ लाख रुपयांचा निधी चैत्य स्मारकाच्या बांधकामासाठी मिळाला. या रकमेपैकी उर्वरित ७० लाख रुपयांचा निधी शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा - लातूरमध्ये 'दयानंद'चा आनंददायी उपक्रम; सांडपाण्याचा होतोय पुनर्वापर

आमदार अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असताना निधीअभावी काम रखडले आहे. आता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे असून मतदारसंघातील रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे. त्यामुळेच भावाने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कामाला अंतिम स्वरूप देण्यासाठी धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. मात्र, ऐन महापरिनिर्वाण दिनाच्या तोंडावरच या निधीची मागणी केल्याने विविध अंगाने चर्चेला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - लातुरात टिप्पर, दुचाकीची धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

Intro:भावाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी धीरज देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करण्यात आल्या आहेत. याठिकाणी भव्य चैत्य स्मारक उभारले जात आहे. यासाठी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, यामधील उर्वरित ७० लाख रुपये मंजूर होणे बाकी आहे. त्यामुळे निधी मंजूर करून स्मारकाचे काम पूर्ण आ. धीरज देशमुख यांनी निधीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Body:डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी पानगाव येथे जतन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूरनंतर पानगाव हे अनुयायांचे मोठे प्रेरणास्थान आहे. मराठवाड्याचे भूषण असलेल्या या स्थळाला महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून अनुयायी भेट देत असतात. या प्रेरणास्थळाच्या ठिकाणी स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आमदार अमित विलासराव देशमुख यांनी चैत्य स्मारकाच्या उभारणीसाठी शासनाकडून ४ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करुन घेतले. या निधीपैकी ४ कोटी २ लाख रुपयांचा निधी चैत्यस्मारकाच्या बांधकामासाठी मिळाला. शासनाची प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या रकमेपैकी उर्वरित ७० लाख रुपयांचा निधी शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत त्वरित उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आ. अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हे काम सुरु करण्यात आले होते. मात्र, स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असताना निधीअभावी काम रखडले आहे. आता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे आहेत. मतदार संघातील रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे. त्यामुळेच भावाने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या कमला अंतिम स्वरूप देण्यासाठी धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. Conclusion:ऐन महापरिनिर्वाण दिनाच्या तोंडावरच या निधीची मागणी केल्याने विविध अंगाने चर्चेला सुरवात झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.