ETV Bharat / state

लातूर 'अनलॉक': महिन्याभरानंतर शहरातील बाजारपेठा सुरू, नागरिकांची वर्दळ - lockdown latur

नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे. त्यानुसार आज शहरात वर्दळ तर कमी होतीच, शिवाय नागरिक नियमांचे पालन करीत असल्याचे चित्रही शहरात पाहावयास मिळत आहे. नियमात शिथिलता असली तरी नागरिकांनी एकत्र जमू नये, तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लातूर
महिन्याभरानंतर शहरातील बाजारपेठा सुरू
author img

By

Published : Aug 17, 2020, 3:59 PM IST

लातूर- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्याभरापासून लातूर शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर आजपासून शहरातील बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, सकाळपासूनच नागरिकांची रस्त्यावर वर्दळ पाहावयास मिळत आहे. शहरात पानटपऱ्या आणि हॉटेल्स वगळता सर्वकाही सुरू करण्यात आले आहे.

लातूर 'अनलॉक': महिन्याभरानंतर शहरातील बाजारपेठा सुरू, नागरिकांची वर्दळ

जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार २४३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पैकी २ हजार २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे लातूर शहरात आहेत. त्यामुळेच १५ दिवसाचे लॉकडाऊन महिनाभर वाढविण्यात आले होते. यात लातूर शहर वगळता नगरपालिका आणि नगरपरिषद या ठिकाणी नियम, अटी शिथिल करण्यात आले होते. मात्र, शहरातील लॉकडाऊन १५ ऑगस्टपर्यंत कायम होते. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील व्यापारी उद्योजक यांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या, त्यांनतर आजपासून सर्व बाजारपेठ खुली करण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे. त्यानुसार आज शहरात वर्दळ तर कमी होतीच, शिवाय नागरिक नियमांचे पालन करीत असल्याचे चित्रही शहरात पाहावयास मिळत आहे. नियमात शिथिलता असली तरी नागरिकांनी एकत्र जमू नये, तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेह वाचा- 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.