ETV Bharat / state

खरिपाच्या पिकांची दुरवस्था; शेतकऱ्याने गाण्यातून मांडली व्यथा..

author img

By

Published : Nov 1, 2019, 9:43 AM IST

Updated : Nov 1, 2019, 12:12 PM IST

मराठवाड्यात सध्या अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे खरिपाचा हंगाम पुरता गेला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मात्र कोणीही पुढे सरसावत नाही. शेतकऱ्यांचा टाहो लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळेच शेतकऱ्याने आपले दुखः व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनावर एक कविता गायली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

Maharashtra farmer expressing sorrow through poem

लातूर - यंदाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपता संपत नाही आहे. पेरणीनंतर पावसाने चांगलीच उघडीप दिली. त्यामुळे कोवळे मोड पुढे वाढलेच नाहीत. रिमझिम पडलेल्या पावसाच्या थेंबा-थेंबाने उरली सुरली रोपे हळू-हळू मोठी होऊ लागली तेव्हा निराश झालेल्या बळीराजाच्या पिकाला नवसंजवनी मिळाली. मात्र, शेतकऱ्यांच्या हातची मूग, उडीद यांसारखी नगदी पिके हातून गेली होतीच. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, कापूस या खरिपाच्या पिकांवरच शेतकऱ्याची दिवाळी अवलंबून होती.

खरिपाच्या पिकांची दुरावस्था; शेतकऱ्याने कवितेतून मांडली व्यथा..

बैलपोळ्याच्या आसपास वरुणराजाने थोडी कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे शिवारातील पिके डोलू लागली. थोड्याच दिवसात शिवारातील पिके काढणीस आली. त्यातच, परतीच्या पावसाने आपली हजेरी लावली आणि शेतातील उभे पीक आडवे केले.

विधानसभेच्या धामधुमीत ना राजकारण्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष गेले ना प्रसारमाध्यमांचे. त्यामुळे मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये हा शेतकरी आपल्या शेतातील पूर्णपणे वाया गेलेले पीक उचलून दाखवत हे गाणे सादर करत आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे. यावर सरकारकडून केवळ घोषणांचे मलम लावले जात आहे. तर, प्रसारमाध्यमेही सध्या इतर विषयांनाच महत्त्व देत आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सोशल मीडियाचा मार्ग अवलंबला आहे. हे पाहून तरी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे सरकारच्या नजरा फिरतील का? असा सवाल या शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहाणाऱ्या प्रत्येक नेटकऱ्यांना पडलाय..

हेही वाचा : 'मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा', शेतकऱ्याची मागणी

Intro:अवस्था खरिपाच्या पिकांची ; शेतकऱ्यांनी मांडली कवितांमधून व्यथा.

मराठवाड्यात सध्या बे मोसमी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे, या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातचा खरिपाचा हंगाम चक्कच गेला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कोणीच पुढे सरसावत नाही. म्हणून चक्क एका शेतकऱ्याने आपले दुखः व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनावर एक कविता गाऊन सोशल मीडियावर व्हारल केली आहे.
Body:

लातूर:-या वर्षाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांच्या मागचे
शुक्लकाष्ठ काही संपतच नाही. पेरणी नंतर पावसाने चांगलीच उगडीप दिली,त्यामुळे कोवळे मोड जमिनीत
न उमगता राहून गेली. रीमझीम पडलेल्या पावसाच्या थेंबा थेंबानेउमगलेली पिकांचे मोड वाऱ्याच्या झुळकेने हळूहळू मोठी झाली.पहाता पहाता पिके फुलोऱ्यात अली. त्यामुळे निराश झालेल्या बळीराज्याला नवं संजवनी मिळाली.मात्र शेतकऱ्यांच्या हातची नगदी पिके मूग,उडीद या सारखी पीक हातून गेली. आता सोयाबीन, ज्वारी,कापूस याच पिकांवर शेतकऱ्यांची दिवाळी आली. पोळ्याच्या संदरणात वरून राजाने थोडी करपादृष्टी दाखवली. त्यावर शिवारातील पिके डोलू लागली.थोड्याच दिवसात शिवारातील पिके काढणीस अली. मात्र त्यात विधानसभेची निवडणूक आली.निवडणुकीच्या प्रचाराला उपस्थि रहाण्यासाठी पुढाऱ्यांनी शेत मजुरांना मजुरी द्यायला सुरुवात केली.
त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीस आलेले पिके काढून घेण्यास मोठी अडचण निर्माण झाली. या अडचणी कमी होत्या म्हणून यात भर टाकण्यासाठी परतीच्या
पावसाने आपली हजरी लावली. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या व काढून ठेवलेल्या पिकांची कायमची वाट लावली. तोपर्यंत विधानसभेची निवडणूकही संपली. या निवडणुकीत शेतात वाटोळे होत असलेली पिके नजरेसमोर ठेऊन आपले सरकार निवडण्यासाठी शेतकऱ्यांनेमतदानाला हजरी लावली. निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधी लगेचच शेतकऱ्यांकडे आपली पाठ फिरवली. आता सत्ता स्थापनेच्या खटाटोपात निवडणुकीच्या काळात याच बळीराजाला दिलेली आश्वासन सर्वच राजकिय पक्षांनी विसरून गेली. एवढ्या संकटाला तोंड देणारा बळीराजा यांची उरली सुरली कसर या पावसाने पूर्ण केली.यावरून प्रसार माध्यमांनीही आपली नजर फिरवली.म्हणून मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने
आपल्या शेतात जाऊन परतीच्या पावसात वाहून जात असलेले सोयाबीन चक्क पाण्यातून काढत खचून न जाता आपल्या व्यथा एक कविता गाऊन मांडल्या आहेत. ही कविता सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र हा शेतकरी कुठला आहे, त्यांचे नाव ,गाव, काय आहे हे कळू शलेले नाही, मात्र या शेतकऱ्याने खरीपाच्या पिकांची व शेतकऱ्यांची व्यथा धाडस करून आपल्या कवितेतून जगा समोर मांडली हे विषेश आहे.

Conclusion:अवस्था खरिपाच्या पिकांची ; शेतकऱ्यांनी मांडली कवितांमधून व्यथा.

मराठवाड्यात सध्या बे मोसमी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे, या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातचा खरिपाचा हंगाम चक्कच गेला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कोणीच पुढे सरसावत नाही. म्हणून चक्क एका शेतकऱ्याने आपले दुखः व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनावर एक कविता गाऊन सोशल मीडियावर व्हारल केली आहे.

लातूर:-या वर्षाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांच्या मागचे
शुक्लकाष्ठ काही संपतच नाही. पेरणी नंतर पावसाने चांगलीच उगडीप दिली,त्यामुळे कोवळे मोड जमिनीत
न उमगता राहून गेली. रीमझीम पडलेल्या पावसाच्या थेंबा थेंबानेउमगलेली पिकांचे मोड वाऱ्याच्या झुळकेने हळूहळू मोठी झाली.पहाता पहाता पिके फुलोऱ्यात अली. त्यामुळे निराश झालेल्या बळीराज्याला नवं संजवनी मिळाली.मात्र शेतकऱ्यांच्या हातची नगदी पिके मूग,उडीद या सारखी पीक हातून गेली. आता सोयाबीन, ज्वारी,कापूस याच पिकांवर शेतकऱ्यांची दिवाळी आली. पोळ्याच्या संदरणात वरून राजाने थोडी करपादृष्टी दाखवली. त्यावर शिवारातील पिके डोलू लागली.थोड्याच दिवसात शिवारातील पिके काढणीस अली. मात्र त्यात विधानसभेची निवडणूक आली.निवडणुकीच्या प्रचाराला उपस्थि रहाण्यासाठी पुढाऱ्यांनी शेत मजुरांना मजुरी द्यायला सुरुवात केली.
त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीस आलेले पिके काढून घेण्यास मोठी अडचण निर्माण झाली. या अडचणी कमी होत्या म्हणून यात भर टाकण्यासाठी परतीच्या
पावसाने आपली हजरी लावली. या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या व काढून ठेवलेल्या पिकांची कायमची वाट लावली. तोपर्यंत विधानसभेची निवडणूकही संपली. या निवडणुकीत शेतात वाटोळे होत असलेली पिके नजरेसमोर ठेऊन आपले सरकार निवडण्यासाठी शेतकऱ्यांनेमतदानाला हजरी लावली. निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधी लगेचच शेतकऱ्यांकडे आपली पाठ फिरवली. आता सत्ता स्थापनेच्या खटाटोपात निवडणुकीच्या काळात याच बळीराजाला दिलेली आश्वासन सर्वच राजकिय पक्षांनी विसरून गेली. एवढ्या संकटाला तोंड देणारा बळीराजा यांची उरली सुरली कसर या पावसाने पूर्ण केली.यावरून प्रसार माध्यमांनीही आपली नजर फिरवली.म्हणून मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने
आपल्या शेतात जाऊन परतीच्या पावसात वाहून जात असलेले सोयाबीन चक्क पाण्यातून काढत खचून न जाता आपल्या व्यथा एक कविता गाऊन मांडल्या आहेत. ही कविता सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

निसर्गाच्या आवकृपेमुळे शेतकरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे. यावर सरकारकडून केवळ घोषणांच मलम लावलं जात आहे. प्रसार माध्यमातून आवाज
उठवला तरी तो कुठेतरी दाबला चाललाय, म्हणून सध्या शेतकऱ्यांनी सोशल मीडियाचा मार्ग अवलंबलाय. हे पाहून तरी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे
सरकारच्या नजरा फिरतील का ? असा सवाल या शेतकऱ्याचा व्हेडीओ पहाणाऱ्या प्रत्येक नेट कऱ्यांना पडलाय.एवढं दुःख आपल्या मनात साठवून येवढ्या उध्दार अंतकरणाने ज्या शेतकऱ्याने खरिपाच्या पिकांची अवस्था कवितेतून व्यक्त करण्याच धाडस केलंय याच तरी तिज होईल का ?
Last Updated : Nov 1, 2019, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.