ETV Bharat / state

दुष्काळाच्या छायेतही गणेश भक्तांचा उत्साह शिघेला; लातुरात ढोल ताश्याच्या गजरात गणरायाचे आगमन - पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव

शहरात राजस्थानी विद्यालय, शिवाजी चौक, नवीन रेणापूर नाका, औसा रोड या ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल थाटण्यात आले होते. दुष्काळाच्या छायेत जरी यंदाचे सण असले, तरी आज गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशी गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

लातुरात दुष्काळाच्या छायेतही गणेश भक्तांचा उत्साह शिघेला
author img

By

Published : Sep 2, 2019, 7:46 PM IST

लातूर- जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी लातुरकरांनी गणरायाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळपासूनच नागरिकांची गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी जमली होती. दुष्काळाबरोबरच यंदा गणेशमूर्तीच्या किमतीमध्ये १० टाक्यांनी वाढ झाली होती. मात्र असे असतानाही नागरिकांनी उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत केले.

लातुरात दुष्काळाच्या छायेतही गणेश भक्तांचा उत्साह शिघेला

शहरात राजस्थानी विद्यालय, शिवाजी चौक, नवीन रेणापूर नाका, औसा रोड या ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल थाटण्यात आले होते. दुष्काळाच्या छायेत जरी यंदाचे सण असले, तरी आज गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात घरगुती गणपती स्थापनेसाठी नागरिकांनी कुटुंबासमवेत उपरोक्त ठिकाणी हजेरी लावली होती. या ठिकणांहून गणेशमूर्तीबरोबरच सजावटीचे साहित्यही नागरिकांनी खरेदी केले होते.

दुपारनंतर मात्र, गणेश मंडळाच्या भक्तांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. ढोल ताशाच्या गजरात आणि लेझीम पथकाच्या तालावर तरुणाईने गणरायाचे स्वागत केले. मानाचा मानला जाणारा आजोबा गणपतीची सायंकाळी ७ च्या दरम्यान स्थापना होणार आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी नागरिकांमधील गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नव्हता. ग्रामीण भागातही दुपारनंतर गणेशमूर्ती स्थापणेस प्रारंभ झाला.

गणरायाच्या आगमनाप्रसंगी शहरासह जिल्ह्यात जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील मानाच्या गणपतीच्या ठिकाणीही स्वयंसेवकासह पोलीस अधिकारी ठाण मांडून आहेत. रात्री १० पर्यंत सर्व गणेशमुर्तींचे स्थापना होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले आहे.

Intro:दुष्काळाच्या छायेतही गणेश भक्तांचा उत्साह शिघेला : ढोल तश्याच्या गजरात गणरायाचे आगमन
लातूर : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत लातूरकरांनी केले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळपासून नागरिकांनी गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दुष्काळाबरोबरच यंदा गणेशमूर्तीच्या किमतीमध्ये 10 टाक्यांनी वाढ झाली असतानाही नागरिकांनी उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत केले.

Body:शहरात राजस्थानी विद्यालय, शिवाजी चौक, नवीन रेणापूर नाका, औसा रोड याठिकाणी गणेशमूर्तीचे स्टॉल थाटण्यात आले होते. दुष्काळाच्या छायेत यंदाचे सण असले तरी आज गणेश मूर्ती स्थापनेच्या दिवशी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात घरगुती गणपती स्थापनेसाठी नागरिकांनी कुटुंबासमवेत हजेरी लावली तर या ठिकणी गणेशमूर्ती बरोबरच सजावटीचे साहित्यही नागरिकांनी खरेदी केले होते. दुपारनंतर मात्र, गणेश मंडळाच्या भक्तांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. ढोल तश्याच्या गजरात आणि लेझीम पथकाच्या तालावर तरुणाईने गणरायाचे स्वागत केले. मनाचा मानला जाणारा आजोबा गणपतीची सायंकाळी 7 च्या दरम्यान स्थापना होणार आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी नागरिकांनी गणेशोत्सवातील उत्साह मात्र कमी केलेला नाही. ग्रामीण भागातही दुपारनंतर गणेशमूर्ती स्थापणेस प्रारंभ झाला होता.

Conclusion:गणरायाच्या आगमनाप्रसंगी शहरासह जिल्ह्यात जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील मनाच्या गणपतीच्या ठिकाणीही स्वयंसेवकासह पोलीस अधिकरी ठाण मांडून आहेत. रात्री 10 पर्यंत सर्व गणेशमूर्तींचे स्थापना होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.