ETV Bharat / state

लातूरच्या तरुणाईचा सरकारकडून अपेक्षाभंग; बेरोजगारी, शैक्षणिक समस्या आजही कायम

गेल्या अनेक वर्षांपासून लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. वारंवार यावर आश्वासने देऊनही यावर तोडगा निघाला नाही, हे दुर्दैव असल्याची भावना येथील तरुणांनी व्यक्त केली आहे.

लातूर
author img

By

Published : Oct 5, 2019, 11:04 AM IST

लातूर - सरकारच्या कामगिरीबाबत लातूरची तरुणाई कितपत समाधानी ? सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीला लातुरच्या तरूणाईकडून किती गुण ? काय आहेत लातूरच्या तरुणांच्या अपेक्षा, या सर्व प्रश्नांबाबत लातूर शहरातील जयक्रांती महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांशी ईटीव्ही भारतने चर्चा केली आहे...

सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीबाबत लातूरच्या तरूणाईचे मत काय, आगामी काळात तरूणांच्या अपेक्षा काय आहेत.. याबाबत येथील तरूणांसोबत ईटिव्ही भारतने चर्चा केली आहे

हेही वाचा... देशमुख बंधूंचा उमेदवारी अर्ज दाखल; रितेश जेनेलियाची उपस्थिती

तरुण मतदारांना केंद्रस्थानी ठेवून सरकार सत्तेत आले. मात्र, आजही तरुणांना भविष्याची चिंता सतावत असून बेरोजगारी आणि शिक्षणातील शिष्यवृत्ती, रोजचा प्रवास यांसारख्या समस्या कायम आहेत. आश्वासनांची खैरात करत युवा पिढीला आकर्षित करत एक ना अनेक आश्वासने 5 वर्षांपूर्वी सरकारने दिली होती. मात्र, सत्ता स्थापन झाल्यानंतर या सर्व बाबींचा विसर पडला आहेत. अशा संतप्त भावना नवमतदारांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा... लातुरात परतीचा मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तरुणाईच्या मनात काय आहे, याचा वेध घेण्याचा प्रयत्नकेला असता. आजही विद्यार्थ्यांना बेरोजगरीमुळे भविष्याविषयी चिंता वाटत असल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून युवकांचे स्थलांतर होत आहे. स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी ना सरकार ना लोकप्रतिनिधी प्रयत्न करत, असे येथील विदयार्थ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा... लातूर शहरातील अपक्ष उमेदवाराची शक्कल, अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासही अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी सर्वसाधारण खंत विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. केवळ घोषणाबाजी आणि अश्वासनातच 5 वर्ष गेली, असा आरोप येथील युवकांनी केला आहे. याबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शेतीव्यवसाय कसा अडचणीत आला आहे, याचे वास्तव मांडले. सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांना दुष्काळाचा विसर पडत असून आजही लातूरकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'​​​​​​​

Intro:तरुणांचा अपेक्षाभंग : बेरोजगारी अन शैक्षणिक समस्या आजही कायम
लातूर : तरुण मतदारांना केंद्रस्थानी ठेवून युती सरकार सत्तेत आले. मात्र, आजही तरुणांना भविष्याची चिंता सतावत असून बेरोजगारी आणि शिक्षणातील शिष्यवृत्ती, पासेस यासारख्या समस्या कायम आहेत. आश्वासनांची खैरात करीत युवा पिढीला आकर्षित करीत एक ना अनेक आश्वासने 5 वर्षपूर्वी सरकारने दिली होती. मात्र, सत्ता स्थापित करताच या सर्व बाबींचा विसर पडला असून नावमतदारांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. लातूरतील जयक्रांती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता हे वास्तव समोर आले आहे.

Body:आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तरुणाईच्या मनात काय याचा वेध घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतच्या माध्यमातून करण्यात आला. आजही विद्यार्थ्यांना बेरोजगरीमुळे भविष्यविषयी चिंता वाटत आहे. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून युवकांचे स्थलांतर होत आहे. स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी ना सरकारने ना लोकप्रतिनिधीने प्रयत्न केले असल्याचे विदयार्थ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासही अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ घोषणाबाजी आणि अश्वासनातच हे 5 वर्ष गेली असल्याचा आरोप येथील युवकांनी केला आहे. याबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शेतीव्यवसाय कसा अडचणीत आहे याचे वास्तव मांडले. सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांना दुष्काळाचा विसर पडत असून आजही लातूरकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Conclusion:गेल्या अनेक वर्षांपासून लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून यावर तोडगा निघाला नाही हे दुर्दैव असल्याच्या भावनाही तरुणांनी व्यक्त केल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.