लातूर - जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर गुरुची भूमिका महत्वाची आहे. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन आणि त्यानुसार झालेली वाटचाल यामुळेच आज हे शक्य झाले आहे. ही सर्व भूमिका आई-वडील आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांमुळे निभावली असल्याचे मत लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी गुरुपौर्णिमा दिनानिमित्त व्यक्त केले आहे.
जीवनाच्या वळणावर आई-वडिलांनी केलेले संस्कार महत्वाचे ठरले आहेत. आई-वडील शेतकरी असून जीवनात सत्य आणि यश मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न ही शिकवण लहान वयातच दिल्याने माझा जीवन जगण्याचा पाया मजबूत झाला. त्याला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आकार दिला. त्यामुळे आई-वडील आणि प्राध्यापक यांच्या संस्कारामुळेच आज प्रगती होत असल्याचे जाधव यांनी सांगितले.