लातूर - शहरातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी एमडीए विद्यालय, महानगरपालिका आणि रोटरी क्लबने येथील जिल्हा क्रीडा संकुलनावर सर्व व्यवस्था केली होती. मात्र, सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे लातूरकरांना सूर्यग्रहणाचे प्रत्यक्षात दर्शन झाले नसले तरी प्रात्यक्षिक आणि मैदानावर सूर्यग्रहणाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. सूर्यग्रहणाचे दर्शन झाले नसले तरी ते नेमके काय आहे? याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली.
हेही वाचा - सूर्यग्रहणादरम्यान भारतातील हे एकमेव मंदिर असते खुले; राहू-केतू पूजेसाठी भाविकांची गर्दी
सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा परिषदेसह विविध शाळेतील विद्यार्थी क्रीडा संकुलनावर एकवटले होते. सूर्यग्रहण पाहता यावे म्हणून योग्य त्या सूचना आणि गॉगल्स देण्यात आले होते. त्यानुसार शहरातून 21 मनपा शाळेतील तब्बल विद्यार्थी आणि पालक एकवटले होते. शास्त्रीय पद्धतीने माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. प्रत्यक्षात सूर्यग्रहण पाहण्यास ढगाळ वातावरणामुळे अडथळा निर्माण झाला तरी, उद्देश मात्र साधण्यात आला असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुलनावर विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणासंदर्भात माहिती देण्यात आली. सकाळी ठीक 9 वाजून 45 मिनिटांनी हे सूर्यग्रहण पाहता येणार होते. परंतु, ढगाळ वातावरणामुळे हे दिसू शकले नाही.