लातूर - उमेदवारी जाहीर करण्यापासून भाजपची चुकलेली गणिताचा परिणाम थेट जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचवरही दिसून आला आहे. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा जिल्ह्यात गतवैभव मिळवले आहे. जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी ४ ठिकाणी महाघाडी तर २ ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या लातूर शहरात अमित देशमुख तर औसा मतदारसंघात अभिमन्यू पवार हे विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपाने केवळ जागा वाटप आणि अंतर्गत मतभेद यावरून जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाला अपयश मिळाले असल्याचे, ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात महाघाडीच्या अस्तित्वाची लढाई होती. यामध्ये नेमके काय होणार याकडे राज्याचे लक्ष वेधले होते. लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख यांच्यासमोर शैलेश लाहोटी आणि वंचितचे राजा मणियार यांचे आव्हान होते. मात्र, प्रचार यंत्रणा आणि शहर मतदारसंघात असलेल्या ग्रामीण भागातील मतदारांनी पुन्हा अमित देशमुख यांना संधी दिली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचा निकाल एकतर्फी राहिला असून प्रथमच नशीब अजमावणार्या धीरज देशमुख यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. तर अपेक्षेप्रमाणे निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर यांचा विजय झाले असले तरी मताधिक्य हे कमी झाले आहे.
औसा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी मतमोजणीच्या सुरवातीपासून आघाडीवर असलेले अभिमन्यू पवार हे विजयी झाले आहेत. तर अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघात जागा वाटपात झालेला घोळ भाजपच्या अंगलट आला आहे. अहमदपूर येथे राष्ट्रवादी चे बाबासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत. उदगीर मतदारसंघातही भाजपकडील डॉ. अनिल कांबळे यांना डावलून राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांना प्रथमच मतदारांनी भरभरून साथ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात २ जगावांर काँग्रेस, २ जागांवर राष्ट्रवादी तर २ जागेवर भाजपाला यश मिळाले आहे.
लातूर जिल्ह्याची ओळख ही काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपने वर्चस्व निर्माण केले होते. परंतु जागा वाटपतील गणित चुकले आणि पुन्हा लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला ठरला आहे.
हेही वाचा - निवडणूकीच्या निकालाआधी संभाजीराव निलंगेकरांनी घेतले बालाजी दर्शन
हेही वाचा - लातूर Live - लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख 30 हजार मतांनी आघाडीवर