ETV Bharat / state

स्वच्छता सर्वेक्षणात 'लातूर पॅटर्न' अव्वल; राष्ट्रीय पातळीवरचा पहिल्या पुरस्काराचा मान - घंटागाडी

मनपाचे कर्मचारी आणि नगरसेवकांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रमाची शहराला पुरस्काराच्या रुपाने पावती मिळाली आहे. कचरा व्यवस्थापनाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून ३ ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लातूरला मिळाला आहे.

प्रकल्प दाखवताना नगरसेवक
author img

By

Published : Mar 6, 2019, 11:54 PM IST

लातूर - 'चला आपले लातूर स्वच्छ आणि सुंदर करुया'...या मनपाच्या घोषवाक्यानेच लातूरकरांची सकाळ उजाडत आहे. प्रत्येक घरासमोर ही घोषवाक्य देऊन घंटागाडीमध्ये ओला आणि सुक्या कचऱ्याचे व्यवस्थपन केले जात आहे. मनपाचे कर्मचारी आणि नगरसेवकांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रमाची शहराला पुरस्काराच्या रुपाने पावती मिळाली आहे. कचरा व्यवस्थापनाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून ३ ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लातूरला मिळाला आहे.

प्रकल्प दाखवताना नगरसेवक

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये लातूर मनपाच्यावतीने अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील मुख्य बाजारपेठेत दिवसातून दोन वेळा साफसफाई केली जात आहे. मुख्य शहरातील बाजारपेठेसह सर्व बाजूने येणाऱ्या रस्त्यांवरील भिंतीवर सामाजिक संदेश देऊन जनजागृती केली जात होती. टाकाऊ प्लॅस्टिकपासून आकर्षक वास्तू बनवून या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आसनाची सोय करण्यात आली होती. तत्कालीन मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांचे मार्गदर्शन आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांना कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाची जोड मिळाल्याने मनपाला हे यश मिळाले आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ५ मध्ये चार ठिकाणी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत निर्मितीचे प्रकल्प उभारले.

शासकीय कॉलनी येथे सुक्या कचऱ्याचे विलगीकरण प्रकल्प उभारण्यात आला होता. कचरा डेपोच्या ठिकाणी दिवसाकाठी १ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. अशा अनेक उपक्रमामुळे बुधवारी देशाच्या राजधानीत स्वच्छतेच्या लातूर पॅटर्नचा दबदबा पाहवयास मिळाला. स्वच्छ भारत मिशनचे विनोद कुमार जिंदाल यांच्या हस्ते तत्कालीन मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर, महापौर सुरेश पवार, उपायुक्त संभाजी वाघमारे, सहाय्यक आयुक्त वसुधा अड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील कामांचा मोलाचा वाटा राहिला आहे. याच प्रभागात नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मतीचा प्रकल्प उभा केला होता. शिवाय शासकीय कॉलनीत सुक्या कचऱ्याचे विलीनीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या उपक्रमांचा उल्लेख पुरस्कार प्रदान करताना करण्यात आला आहे.

undefined

Intro:या बातमीत वापरायचा सहाय्यक उपायुक्त वसुधा फड यांचा बाईट मोजो मोबाईलवरून byte wasudha fad या नावाने पाठविला आहे
स्वच्छ सर्वेक्षणात 'लातूर पॅटर्न' ; राष्ट्रीय पातळीवरचा पहिल्या पुरस्काराचा मान
लातूर - 'चला आपले लातूर स्वच्छ आणि सुंदर करुया'...ह्या मनपाच्या घोषवाक्यानेच लातूरकरांची सकाळ उजाडत आहे. प्रत्येक घरासमोर ही घोषवाक्य देऊन घंटागाडीमध्ये ओला आणि सुक्या कचऱ्याचे व्यवस्थपन केले जात आहे. मनपाचे कर्मचारी आणि नगरसेवकांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रमाची आज सबंध शहराला पुरस्काराच्या रुपाने पावती मिळाली आहे. स्वच्छतेमधील सातत्य आणि प्रभाग क्रमांक ५ मध्ये करण्यात आलेले कचरा व्यवस्थापन याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून ३ ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे.
Body:स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये लातूर मनपाच्यावतीने एक ना अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील मुख्य बाजारपेठेत रात्रीची झडवई करून दिवसातून दोन वेळा साफसफाई केली जात आहे. मुख्य शहरातील बाजारपेठेसह चौही बाजूने येणाऱ्या रस्त्यांवरील भिंतीवर सामाजिक संदेश देऊन जनजागृती केली जात होती. टाकाऊ प्लॅस्टिकपासून आकर्षक वास्तू बनवून या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आसनाची सोय करण्यात आली होती. तत्कालीन मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांचे मार्गदर्शन आणि अधिकाऱ्यांच्या सुचनांना कर्मचाऱ्यांच्या परीश्रमाची जोड मिळाल्याने मनपाला हे यश मिळाले आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ५ मध्ये चार ठिकाणी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मितीचे प्रकल्प उभारले. शासकीय कॉलनी येथे सुक्या कचऱ्याचे विलगीकरण प्रकल्प उभारण्यात आला होता. चकरा डेपोच्या ठिकाणी दिवसाकाळी १ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. अशा एक ना अनेक उपक्रमामुळे बुधवारी देशाच्या राजधानीत स्वच्छतेच्या लातूर पॅटर्न चा दबदबा पाहवयास मिळाला. स्वच्छ भारत मिशनचे विनोद कुमार जिंदाल यांच्या हस्ते तत्कालीन मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर, महापौर सुरेश पवार, उपायुक्त संभाजी वाघमारे, सहाय्यक आयुक्त वसुधा अड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Conclusion:प्रभाग क्रमांक ५ मधील वेगळेपणाचा आवर्जून उल्लेख
स्वच्छ सर्वेक्षणात लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील कामांचा मोलाचा वाटा राहिला आहे. याच प्रभागात नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मतीचा प्रकल्प उभा केला होता. शिवाय शासकीय कॉलनीत सुक्या कचऱ्याचे विलीनीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या उपक्रमांचा उल्लेख पुरस्कार प्रदान करताना करण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.