ETV Bharat / state

पोलीस बंदोबस्तात सोयाबीन बाजार समितीत; लातुरात का ओढावली ही परस्थिती? - लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन आवक

सध्या राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसात सोयाबीनची विक्रमी आवक झाली. दिवाळी सण आल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Latur Market
कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Nov 3, 2020, 7:24 PM IST

लातूर - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातूनही शेती मालाची आवक होते. या ठिकाणी आज सोयाबीनची विक्रमी आवक झाली. एका दिवसात तब्बल 1 लाख क्विंटल सोयाबीन बाजार समितीमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे बाजार समितीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची नामुष्की ओढावली.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झाली

दोन दिवसात तब्बल दीड लाख क्विंटल सोयाबीनची आवक -

सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. यंदा पावसाने पिकाचे नुकसान झाले. दिवाळी सण तोंडावर आला आहे. सरकारकडून अद्यापही मदतीच्या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे चार पैसे पदरी पडतील या आशेवर हाती आलेले पीक लगेच विकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दीड किलो मीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 4 हजार 50 रुपये प्रति क्विंटल इतका कमाल दर मिळाला आहे. पावसाने बाधित सोयाबीनला 2 हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. आर्थिक संकटात असलेला शेतकरी दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने मिळेल त्या दरात सोयाबीनची विक्री करत आहे. सोमवारी 60 हजार क्विंटल व मंगळवारी १ लाख क्विंटल सोयाबीन बाजार समितीमध्ये दाखल झाले.

दर घसरण्याची शक्यता -

आवक वाढली की दर घटणार हे बाजारपेठेचे सूत्रचं आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनला 4 हजारपेक्षा अधिक दर मिळत आहे. आता नवीन सोयाबीनची आवकही वाढली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी आवक होत असल्याने आता दर घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हमीभाव केंद्रे ओस, बाजार समितीमध्ये वाढली वर्दळ -

लातूर जिल्ह्यात 15 सोयाबीन हमीभाव केंद्रे उभारण्यात आली आहेत. मात्र, बाजार समितीमध्ये 4 हजारापेक्षा जास्त दर आहे, तर हमीभाव केंद्रावर 3 हजार 800 रुपये आहे. शिवाय त्यांच्या नियम-अटी देखील आहेत. त्यामुळे शेतकरी थेट बाजार समितीकडे मार्गस्थ होत आहेत.

वाहनांच्या लांबच-लांब रांगा -

दिवाळी सण आठ दिवसांवर आला आहे. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे आता पदरी पडलेले सोयाबीन थेट बाजारात आणले जात आहे. त्यामुळे बाजार समितीत वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.

गर्दी वाढल्याने बोलवावे लागले पोलीस -

गेल्या दोन दिवसात अचानक सोयाबीनची आवक वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱयांची आणि वाहनांची गर्दी वाढली होती. गोंधळ होऊन काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांना बोलावण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.