ETV Bharat / state

लातूर लोकसभा : राष्ट्रहिताच्या मुद्याआड स्थानिक विकासाला बगल...!

लातूर लोकसभा मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांनी सातत्याने स्थानिक प्रश्नाला बाजूला सारत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर लढवण्याचे मनसुबे उघड केले आहेत.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख
author img

By

Published : Apr 5, 2019, 11:55 PM IST

लातूर - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आता विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी भाजपला ही निवडणूक देशहिताची वाटत असली तरी काँग्रेसने मात्र, स्थानिक प्रश्नांना अजेंड्यावर घेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आ. अमित देशमुख यांच्यामध्ये शब्दिक द्वंद पाहवयास मिळाले आहे. मात्र, दोन्ही मुद्दे महत्वाचे असून सामान्यांच्या प्रश्नांनाही महत्व देण्याची अपेक्षा सर्वसामान्य लातूरकर व्यक्त करीत आहेत

लातूर लोकसभा मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांनी सातत्याने स्थानिक प्रश्नाला बाजूला सारत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर लढवण्याचे मनसुबे उघड केले आहेत. काल-परवापर्यंत स्थानिक प्रश्नांचा बाऊ करणारी भाजप आता थेट देश सुरक्षा, अर्थव्यवस्था, महिला सबलीकरण यासारख्या मुद्द्यांना हात घालत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र, पाणीप्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती बेरोजगारी आणि उद्योगधंदे आदी प्रश्न अजेंड्यावर घेत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वीही माजी मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनीही राष्ट्रहिताच्या प्रश्नावर लोकांमध्ये जात सलग सातवेळा खासदारकी मिळवली.

लातूरमधील लोकप्रतिनिधी

२०१४ मध्ये जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. नेमका हाच स्थानिक मुद्दा हाताळत लातूरकरांसाठी थेट उजनीहून पाणी आणण्याचे आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आले होते. यामुळेच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला वर्चस्व निर्माण करता आले होते. मात्र, ५ वर्ष उलटूनही पाणीप्रश्न कायमच आहे. त्यामुळे यातून धडा घेत पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्थानिक मुद्यांना हात घातला आहे. लातूर लोकसभा मतदार संघाचा इतिहास पाहता सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रहिताचा मुद्दा हाती घेतला तर विरोधकांनी स्थानिक मुद्यांना घेऊन मतदारांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोन पक्षापुरते मर्यादित असले तरी सर्वसामान्य लातूरकरांनी राष्ट्रहिताबरोबरच स्थानिक प्रश्नांची उकल होणेही आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे हे दोन्ही मुद्दे चर्चीले जात आहेत.

Intro:लातूर लोकसभा : राष्ट्रहीताच्या मुद्याआड स्थानिक विकासाला बगल...!
लातूर - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आता विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रात्यारोपाला सुरवात झाली आहे. सत्ताधारी भाजपाला ही निवडणुक देशहीताची वाटत असली तरी काँग्रेसने मात्र, स्थानिक प्रश्नांना अजेंड्यावर घेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आ. अमित देशमुख यांच्यामध्ये शब्दिक द्वंद पाहवयास मिळाले आहे. मात्र, दोन्ही मुद्दे महत्वाचे असून सामान्यांच्या प्रश्नांनाही महत्व देण्याची अपेक्षा सर्वसामान्य लातूरकर व्यक्त करीत आहेत. Body:लातूर लोकसभा मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांनी सातत्याने स्थानिक प्रश्नाला बाजूला सारत राष्ट्रहीताच्या मुद्दयावर लढिवण्याचे मनसुबे उघड केले आहेत. काल - परवा पर्यंत स्थानिक प्रश्नांचा बाऊ करणारी भाजपा आता थेट देश सुरक्षा, अर्थव्यवस्था, महिला सबलीकरण यासरख्या मुद्दयांना हात घालत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र, पाणीप्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाअी, वाढती बेरोजगारी व उद्योगधंद्ये आदी प्रश्न अजेंड्यावर घेत मतदारांना आपल्याकडे ओळवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वीही माजी मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनीही राष्ट्रहीताचे प्रश्नावर लोकांमध्ये जात सलग सातवेळा खासदारकी मिळवली. २०१४ मध्ये जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. नेमका हाच स्थानिक मुद्दा हाताळत लातूरकरांसाठी थेट उजनीहून पाणी आणण्याचे आश्वासन भाजपाच्या वतीने देण्यात आले होते. यामुळेच काँग्रेसच्या बालेकिल्लयात भाजपाला वर्चस्व निर्माण करता आले होते. मात्र, ५ वर्ष उलटूनही पाणीप्रश्न कायमच आहे. त्यामुळे यातून धडा घेत पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्थानिक मुद्यांना हात घातला आहे. लातूर लोकसभा मतदार संघाचा इतिहास पाहता सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रहीताचा मुद्दा हाती घेतला तर विरोधकांनी स्थानिक मुद्यांना घेऊन मतदारांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोन पक्षापुरते मर्यादित असले तरी सर्वसामान्य लातूरकरांनी राष्ट्रहीताबरोबरच स्थानिक प्रश्नांची उकल होणेही आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. Conclusion:गेल्या चार दिवसांपासून पालकमंत्री संभाजी पाटील -निलंगेकर व आ. अमित देशमुख यांच्या आरोप-प्रत्ययारोपामुळे हे दोन्ही मुद्दे चर्चीले जात आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.