ETV Bharat / state

महिला दिन विशेष : बालविवाह ते महिला संघटनेचे नेतृत्व, अशी आहे 'ति'च्या खडतर प्रवासाची कहाणी - women self help group news

कुशावर्ता बेळे यांनी विविध संस्थांमध्ये काम केल्यानंतर १९९६ साली त्यांनी ग्रामीण महिला विकास संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत त्या बचत गटाचे आणि महिला सबलीकरणचे धडे देत आहेत. त्यांच्या या उपक्रमातून केवळ देवणी तालुक्यात ७५० बचत गट निर्माण करण्यात आले असून यामाध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. एवढेच नाही समुपदेशनातून हजारो जोडप्यांचे संसार सुरळीत झाले आहेत.

बालविवाह झालेल्या कुशावर्ता बेळेंची अनोखी कहाणी

author img

By

Published : Mar 8, 2020, 4:00 AM IST

Updated : Mar 8, 2020, 8:28 AM IST

लातूर - महापुरुषांचे विचार केवळ भाषणांत आणि सामाजिक कार्यक्रमात ऐकावयास मिळतात. मात्र, जिल्ह्यातील देवणी येथील कुशावर्ता बेळे यांनी हे विचार प्रत्यक्षात उतरवून महिलांसाठी काम केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी महिलांचे संघटन उभे केले आहे. शिवाय समुपदेशनाच्या माध्यमातून काडीमोड होणारे संसारही रोखले आहेत. गेल्या ३० वर्षापासून त्यांचे हे काम सुरू असून जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कामाचा घेतलेला हा विशेष आढावा

बालविवाह झालेल्या कुशावर्ता बेळेंची अनोखी कहाणी

कुशावर्ता यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. मूलभूत गरजाही मिळत नसल्याने शिक्षण तर लांबचाच विषय होता. मात्र, जिद्द, चिकाटी आणि महिला संघटनाचे कौशल्य लहानपापासूनच त्यांच्याकडे होते. त्यामुळेच रोजंदारीवर असतानाही त्यांनी महिलांचे संघटन उभे केले. बालपणाची असलेली आवड हेच त्यांचे भविष्यातील काम झाले. कुशावर्ता बेळे यांचे अवघ्या १२ व्या वर्षी बालविवाह झाला. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी रात्रीच्या शाळेत जाऊन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरकामांबरोबर महिलांबाबतचे काम पाहून त्यांना विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक संधीचे सोने केल्याने महिलांबाबतची तळमळ पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, संजय दत्त यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

विविध संस्थांमध्ये काम केल्यानंतर १९९६ साली त्यांनी ग्रामीण महिला विकास संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत त्या बचत गटाचे आणि महिला सबलीकरणचे धडे देत आहेत. त्यांच्या या उपक्रमातून केवळ देवणी तालुक्यात ७५० बचत गट निर्माण करण्यात आले असून यामाध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. एवढेच नाही समुपदेशनातून हजारो जोडप्यांचे संसार सुरळीत झाले आहेत.

हेही वाचा - महिला दिन विशेष: मराठी भाषेच्या उन्नतीसाठी बंगाली महिलेचा पुढाकार; काय केलं ते वाचा सविस्तर....

महिलांच्या संघटनेमुळेच कुशावर्ता बेळे ह्या जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती राहिल्या होत्या. मात्र, राजकारणात अधिक न गुंतून राहता त्यांनी आपली मूळ कामे सुरू ठेवली. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी या त्यांच्या सरळ वर्तणुकीमुळे कामाचा आवाखा दिवसेंदिवस वाढत आहे.

स्वतःचा बालविवाह होऊन देखील महिलांसाठी लढणाऱ्या कुशावर्ता बेळे यांचे काम नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यामुळेच देवणी सारख्या शहरात राज्य महिला आयोगाचे तालुकास्तरीय समुदेशन केंद्र येथे बनले आहे. बालवयातच लग्नाची गाठ गळ्यात पडलेल्या कुशावर्ता बेळे आज शेकडों महिलांना समुपदेशनाद्वारे घडवत आहेत.

हेही वाचा - #WomensDay: वेल्डिंगच्या व्यवसायात 'ति'ने उमटविला आपला वेगळा ठसा

Last Updated : Mar 8, 2020, 8:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.