ETV Bharat / state

पावसानं शेतकऱ्यांच्या कळजाचं पाणी-पाणी; उरलं- सुरलं परतीच्या पावसानं हिसकावून घेतलं...! - लातूर परतीच्या पावसाने नुकसान

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्यावेळी मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. लातूरमध्ये खरिपात सोयाबीनची 4 लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पैकी 2 लाख 10 हजार क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लातूर
लातूर
author img

By

Published : Oct 16, 2020, 6:48 PM IST

लातूर - दरवर्षी पावसाअभावी कोमेजून जाणारी खरिपातील पिके यंदा मात्र, अतिवृष्टीमुळे पाण्यातच आहेत. चार महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे पिके जोपासली पण अंतिम टप्प्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि उरलं- सुरलं परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. खरिपात सोयाबीनची 4 लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पैकी 2 लाख 10 हजार क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पावसानं शेतकऱ्यांच्या कळजाचं पाणी-पाणी

उत्पादनाच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्वपूर्ण आहे, तर सोयाबीन हे त्यामधील मुख्य पीक. हंगामाच्या सुरुवातीला बियाणांची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्ची करून दुबार पेरणी करावी लागली. पण, ही संकटाची मालिका कायम राहिली आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग ऐन शेवटच्या टप्प्यात असतानाच सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे या पिकांचे नुकसान झाले होते. या काळात 1 लाख 14 हजार हेक्टरावरील पिके बाधित झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा - अतिवृष्टी : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - अजित पवार

या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच दोन दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे उरले- सुरले सगळेच शेतकऱ्यांच्या हातचे हिसकावून घेतले आहे. त्यामुळे आता पंचनामे याची औपचारिकता न ठेवता सरसकट एकरी 50 हजाराची मदत करण्याची मागणी होत आहे. काढणीची कामे वेळेत व्हावीत याकरिता एकरी 4 हजार रुपये देऊन शेतातील पिके काढली खरी मात्र, साठवणूक केलेली गंजीच वाहून गेल्याने आता पैशांची परतफेड करायची कशी? असा प्रश्न बळीराजा उपस्थित करीत आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील निलंगा, शिरूर ताजबंद, औसा या ठिकाणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.