ETV Bharat / state

शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करा - ज्योतिरादित्य सिंधिया

राज्यभर सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. सर्वच पक्षाच्या स्टार प्रचारक नेत्यांची शाब्दिक तोफ धडाडताना दिसत आहे. लातूर येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी पक्षाचे महासचिव ज्योतीरादित्या सिंधिया आले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर घणाघात केला आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया
author img

By

Published : Oct 17, 2019, 9:00 PM IST

लातूर - राज्यभर सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. सर्वच पक्षाच्या स्टार प्रचारक नेत्यांची शाब्दिक तोफ धडाडताना दिसत आहे. लातूर येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी पक्षाचे महासचिव ज्योतीरादित्या सिंधिया आले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर घणाघात केला आहे. देशातील सध्याचे वातावरण पाहता हा काळ कसोटीचा असला तरी लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हे संघर्षांचा वारसा असलेले आहेत. तसेच देशातील आठ शेतकऱ्यांना दिवसाकाठी आत्महत्या कराव्या लागत असल्याने भाजप सरकारला हद्दपार करण्याचे सिंधिया आवाहन केले.

ज्योतिरादित्य सिंधिया लातूर येथील काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना

हेही वाचा - 'मित्रपक्षांचा भाजपने वापर केला, आता फेकून द्यायचे काम केले सुरू'

विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी भाजपकडून कर्नाटकचे मुखमंत्री येडुरप्पा हे दाखल झाले होते तर गुरूवारी काँग्रेसच्यावतीने ज्योतिरादित्य सिंधिया यांची जाहीर सभा झाली. सिंधिया यावेळी म्हणाले, लातूरला पुन्हा विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी हे दोन मतदारसंघ महत्वाचे आहेत. भविष्याचा विचार करून मतदानाला सामोरे जाण्याचे आवाहन ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ ते लातुरात दाखल झाले होते.

लातूर जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. याच मातीतील विलासराव देशमुख यांनी विकासाचा झेंडा थेट मुंबईत रोवला होता. त्यांचे संपूर्ण जीवन जे समकार्यात गेले होते. त्यांचाच वसा अमित आणि धीरज देशमुख पुढे चालवत आहेत. सध्याचा काळ कसोटीचा असला तरी या दोन मतदारसंघात नशीब आजमावत असलेले अमित आणि धीरज हे संघर्षाचा वारसा आहेत. त्यामुळे भीतीचे कारण नाही विकासात सातत्य ठेवण्यासाठी यांच्याशिवाय पर्याय नाही. असेही यावेळी सिंधिया म्हणाले.

गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. हे या सरकारचे दुर्दैव आहे. हीच योग्य वेळ आहे युतीला त्यांची जागा दाखवण्याची. भर पावसाळ्यात टँकर सुरू असून अद्यापही आरोग्याचा प्रश्न कायम आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय अमित देशमुख यांचे हावभाव हे अगदी विलासराव देशमुख यांच्यासारखे असून त्यांच्यासारखाच विकास करण्यासाठी या दोघा भावांना संधी देण्याचे आवाहन सिंधीया यांनी केले. यावेळी उल्हास पवार, माजी मंत्री दिलीप देशमुख, वैशाली देशमुख यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - पुस्तकातून शिवरायांचा धडा बाजूला करणाऱ्या सरकारला हाकलून लावा - अशोक चव्हाण

Intro:काळ कसोटीचा पण वारसा संघर्षाचा : ज्योतिरादित्य सिंधिया
लातूर : देशातील सध्याचे वातावरण पाहता का काळ कसोटीचा असला तरी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हे संघर्षांचा वारसा असलेला आहे. त्यामुळे लातूरला पुन्हा विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी हे दिन मतदारसंघ महत्वाचे आहेत. भविष्याचा विचार करून मतदानाला सामोरे जाण्याचे आव्हान ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ ते लातुरात दाखल झाले होते.
Body:विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी भाजपकडून कर्नाटकचे मुखमंत्री येदुराप्पा हे दाखल झाले होते तर आज काँग्रेसच्या वतीने ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जाहीर सभा घेतली. लातूर जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. याच मातीतील विलासराव देशमुख यांनी विकासाचा झेंडा थेट मुंबईत रोवला होता. त्यांचे संपूर्ण जीवन जे समकार्यात गेले होते. त्यांचाच वसा अमित आणि धीरज देशमुख पुढे चालवीत आहेत. सध्याचा काळ कसोटीचा असला तरी या दोन मतदारसंघात नशीब आजमावत असलेले अमित आणि धीरज हे संघर्षाचा वारसा आहेत. त्यामुळे भीतीचे कारण नाही विकासात सातत्य ठेवण्यासाठी यांच्याशिवाय पर्याय नाही. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. देशाच्या अन्नदात्याची हि अवस्था असून दिवसाकाठी ८ शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. हे या सरकारचे दुर्दैव्य आहे. हीच योग्य वेळ आहे युतीला त्यांची जागा दाखविण्याची. भर पावसाळ्यात टँकर सुरु असून अद्यापही आरोग्याचा प्रश्न कायम आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय अमित देशमुख यांचे हावभाव हे अगदी विलासराव देशमुख यांच्यासारखे असून त्यांच्यासारखाच विकास करण्यासाठी या दोघं भावांना संधी देण्याचे आवाहन केले. Conclusion:यावेळी उल्हास पवार, माजी मंत्री दिलीप देशमुख, वैशालीताई देशमुख यांची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.