ETV Bharat / state

लातुरात नागरिकत्व विधेयकाविरोधात 'जमीयत उलेमा हिंद'चा मूकमोर्चा

हा कायदा देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक आहे. देशात केवळ हुकूमशाही सुरु आहे. देशातील नागरिकांची चिंता या सरकारला नाही. परंतु, परदेशाच्या नागरिकांची एवढी चिंता का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

Jamiat Ulema Hind agitation
लातुरात जमीयत उलेमा हिंदचा मूकमोर्चा
author img

By

Published : Dec 14, 2019, 3:08 AM IST

लातूर - नागरिकत्व विधेयकाला विरोध करत लातुरात शुक्रवारी जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या विधेयकामुळे देशातील नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

लातुरात जमीयत उलेमा हिंदचा मूकमोर्चा

हेही वाचा - लातूरमध्ये 'कॅब'च्या विरोधात 'जमीयत ए उलेमा हिंद' इतर पक्षांचा मोर्चा

नागरिकत्व विधेयक मंजूर झाले असले तरी या विधेयकाला मुस्लीम समाजाच्यावतीने विरोध केला जात आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्थान, बांगलादेश आणि पाकिस्थानातील हिंदू, शीख, बौद्ध जैन आणि पारशी या समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. मात्र, यामध्ये मुस्लीम समाजाचा समावेश नाही. त्यामुळे या विधेयकाला विरोध करत गंजगोलाई ते गांधी चौक या दरम्यान हजारो मुस्लीम बांधवानी मूकमोर्चात सहभाग नोंदवला.

हेही वाचा - बसखाली चिरडून वृद्ध प्रवाशाचा मृत्यू; लातूरच्या किनगावातली घटना

हा कायदा देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक आहे. देशात केवळ हुकूमशाही सुरु आहे. देशातील नागरिकांची चिंता या सरकारला नाही. परंतु, परदेशाच्या नागरिकांची एवढी चिंता का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. या धोरणामुळे जातीयवाद वाढणार आहे. त्यामुळे 'सबका साथ, सबका विकास' म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारची हीच का भूमिका? असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

Intro:नागरिकत्व विधेयकाच्या विरोधासाठी लातुरात मुस्लिम बांधवांचा मूकमोर्चा
लातूर : नागरिकत्व विधेयकाला विरोध करीत लातुरात आज जमाते उलेमा ए हिंद या संघटनेच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या विधेयकामुळे देशातील नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे याला विरोध करीत आज मूकमोर्चा काढण्यात आला.
Body:नागरिकत्व विधेयक मंजूर झाले असले तरी या विधेयकाला मुस्लिम समाजाच्यावतीने विरोध केला जात आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्थान, बांगलादेश आणि पाकिस्थानातील हिंदू, शीख, बौद्ध जैन आणि पारशी या समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी ११ वर्ष भारतामध्ये वास्तव्य करणे आवश्यक राहणार आहे तर शेजारच्या देशांमधून हिंदू अल्पसंख्यांक समुदायासाठी हि अट ६ वर्ष करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये मुस्लिम समाजाचा समावेश नाही शिवाय या विधेयकामुळे समाजावर अन्याय होणार असल्याने गंजगोलाई ते गांधी चौक या दरम्यान हजारो मुस्लिम बांधवानी मूक मोर्चात सहभाग नोंदवला होता. हा कायदा देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक आहे. देशात केवळ हुकूमशाही सुरु आहे. देशातील नागरिकांची चिंता या सरकारला नाही परंतु परदेशाच्या नागरिकांची एवढी चिंता का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला होता. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. Conclusion:या धोरणामुळे जातीयवाद वाढणार आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारची हीच का भूमिका असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.