लातूर - जिल्ह्याने विभागात अव्वलस्थान कायम राखले असले तरी राज्यातील 9 विभागीय मंडळात लातूर विभागाची गुणवत्तेमध्ये 6 व्या स्थानावर घसरण झाली आहे. लातूर पटर्नमध्ये बारावी परीक्षेत यंदाही मुलीनीच बाजी मारली असून गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल 1 टक्क्याने घसरला आहे. राज्यभर दबदबा असलेल्या लातूर पटर्नची राज्याच्या निकालात झालेली घसरण चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळातून 73 हजार 988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यामध्ये 82. 19 टक्के मुले तर 91. 24 टक्के मुली आहेत. विभागाचा सरासरी निकाल 86.08 टक्के लागला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याचा 86.20 टक्के निकाल लागला असून उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 82.63 तर मुलींची टक्केवारी 90.86 आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा 82.72 टक्के निकाल लागला असून यामध्ये मुलांची टक्केवारी ही 76.64 तर मुलींची 90.38 एवढी टक्केवारी आहे. या विभागातील तिन्हीही जिल्ह्यातून लातूरचा सर्वाधिक 86.08 एवढा निकाल लागला आहे. या निकालात मुले 82.19 तर मुलींनी 91.24 टक्के घेऊन यंदाही बाजी मारली आहे. लातूर विभागातील तिन्हीही जिल्ह्यांमध्ये मुलींनीच आपली छाप उमटीवली आहे.'
लातूर विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक -
विभागीय मंडळात विज्ञान शाखेचा सर्वाधिक 93.05 टक्के निकाल लागला आहे. कला शाखा 78.44 तर वाणिज्य शाखेचा 92.03 व व्होकेशनल शाखेचा 74.49 टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत मात्र, नांदेड जिल्ह्याने 94.20 टक्के विद्यार्थ्यांनी आपला दबदबा राखला आहे, तर वाणिज्य व कला शाखेत लातूर जिल्ह्याचा अनुक्रमे 93.21 व 79.30 असा निकाल लागला आहे.