ETV Bharat / state

लातुरात दहा दिवसात १५ टक्के पाऊस; पेरणीही सरासरीच्या निम्म्यावर - लातूर खरीप हंगाम पेरणी

जिल्ह्यात ७९१ मिमी पावसाची वार्षिक सरासरी असताना आतापर्यंत ८१ मिमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या १५ टक्के पाऊस हा गेल्या दहा दिवसांत झाला आहे. त्यामुळे बळीराजाने पेरणीवरही भर दिला आहे. उत्पादनाच्या दृष्टीने खरीप महत्वाचा मानला जातो. यामध्ये सोयाबीन पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. एकंदरीत खरीपासाठी पाऊस पोषक असल्याने यंदा उत्पादन वाढेल, असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

heavy rain lashes in latur district
लातूर पाऊस
author img

By

Published : Jun 18, 2020, 6:07 PM IST

लातूर - जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला सुरूवात झाली असून, पोषक वातावरण झाले आहे. खरिपात सोयाबीन महत्वाचे पीक असून यंदाही सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. जिल्ह्यात २ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात दररोज पावसाने हजेरी लावली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी अनियमित पावसामुळे यावर्षीच्या खरीप हंगामाबाबत साशंकता होती. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घटही झाली होती. यंदा शेतकरी आशादायी असताना पावसाने वेळेत हजेरी लावली आहे. ७९१ मिमी पावसाची वार्षिक सरासरी असताना आतापर्यंत ८१ मिमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या १५ टक्के पाऊस हा गेल्या दहा दिवसांत झाला आहे. त्यामुळे बळीराजाने पेरणीवरही भर दिला आहे. उत्पादनाच्या दृष्टीने खरीप महत्वाचा मानला जातो. यामध्ये सोयाबीन पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. एकंदरीत खरीपासाठी पाऊस पोषक असल्याने यंदा उत्पादन वाढेल, असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.