ETV Bharat / state

Triton Electric Vehicle : प्रदूषणमुक्तीसाठी सरकारने कसली कंबर; हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक - उद्योगमंत्री उदय सामंत

अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीने ( US based Triton Electric Vehicles Company ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा केली. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. .

Triton Electric Vehicles Company
ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स
author img

By

Published : Dec 9, 2022, 8:11 AM IST

मुंबई : मुंबईसह राज्यात प्रदूषण वाढले ( Pollution increased in the state including Mumbai ) असून यावर उपाययोजना करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी ( For the hydrogen powered vehicle project ) राज्यात मोठी गुंतवणूक होण्याचा मार्ग खुला ( way for huge investment in state is open ) होणार आहे. अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीने ( US based Triton Electric Vehicles Company ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा केली. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स : अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स ही कंपनी विद्युत वाहनांबरोबरच हायड्रोजन वाहन निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्रात हायड्रोजन प्रकल्प आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचे निर्मिती केंद्र सुरु करण्यासाठी ट्रिटॉन कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारकडून पुरवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले : इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा हायड्रोजन वाहने ही वापरण्यास किफायतशीर, सुरक्षित असून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा देखील स्वस्त आहेत. इंग्लंड, जर्मनी, चीन, अमेरिका आदी देशांमध्ये हायड्रोजन वाहनांचा वापर होत असून महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन उपक्रमांतील बसेस भाडेत्त्वावर घेऊन हायड्रोजनवर चालविता येणे शक्य आहे. त्यासाठी कंपनीने सविस्तर प्रस्ताव दिल्यास सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध : राज्यात हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प ट्रिटॉन कंपनीने सुरु केल्यास हायड्रोजन निर्मिती प्रकल्प आणि या प्रकल्पांसाठी लागणारे इतर उद्योगदेखील महाराष्ट्रात सुरु होतील. परिणामी गुंतवणूक वाढेल आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ट्रिटॉन कंपनी जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत महाराष्ट्राबरोबर सामंजस्य करार करणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर, असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून या महामार्गाचा मोठा लाभ उद्योग व्यवसायांना होणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.